- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
सचिन परब,विरार ” खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती,” कार्यशाळा संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या सभागृहात काल “ खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती कार्यशाळा,”संपन्न झाली.या कार्यशाळेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे व उप मुख्य लेखापरीक्षक मनोज पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धतीसंबंधी निर्गमित झालेले नवीन शासन निर्णय व कायदे,शासकीय ध्येय-धोरणे, निविदा कार्यपद्धतीत करावयाचे व झालेले बदल यासंबंधी ही कार्यशाळा पार पडली.महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन व माहिती देऊन सध्या राबवण्यात येत असलेल्या निविदा कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करणे व निविदा कार्यपद्धती नियमानुसार सुरळीत करणे,हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.तसेच उपस्थित अधिकारी व…
दीपक मोहिते, करदात्यांच्या जीवाशी खेळ, धोकादायक इमारती ; यादी प्रसिद्ध करणे,केवळ एक सोपस्कार… ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने यंदाही धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे.दरवर्षी मान्सुनच्या तोंडावर अशाप्रकारची यादी प्रसिद्ध करून मनपा प्रशासन कोणाचे व कसले हित साधत असते,हे कळायला मार्ग नाही. मनपा प्रशासन दरवर्षी आपल्या हद्दीतील धोकादायक इमारतीच्या नावाची यादी जाहीर करत असते.तसेच अशा इमारतीमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसाही बजावते.पण रहिवाशी या नोटीसाना केराची टोपली दाखवतात. कारण या महानगरपालिका क्षेत्रात पर्यायी व्यवस्था ( संक्रमण शिबीर ) नसल्यामुळे रहिवाशी आपल्या इमारती रिकाम्या करत नाहीत.तसेच या रहिवाश्यानी इमारती रिकाम्या कराव्यात,यासाठी प्रशासन देखील आग्रही नसते,कारण…
वसंत भोईर,वाडा उन्हातान्हात किती काळ ठिगळं लावत बसायचे ? चर्मकार समुदायातील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोचींसाठी गटई स्टॉल योजना राबवण्यात येत असते. या योजनेत टिन स्टॉलच्या उभारणीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.परंतु माहितीच्या अभावी अनेक जण या योजनेपासून वंचित आहेत.अजूनही साधा कपडा टाकून किंवा हातगाडीवर उन्हातान्हात चप्पल शिवण्याचे काम करणारे चर्मकार समाजबांधव प्रत्येक चौकात हमखास पाहायला मिळतात. या योजनेची माहिती नसल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.या चर्मकार बांधवांनी उन्हातानात किती दिवस ठिघळं लावायची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील( चर्मकार,मोची) आदी व्यक्तींना त्याचे जीवनमान उंचावणे,समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळावे व त्यांचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक…
वसंत भोईर,वाडा सरकारच्या फसव्या घोषणेमुळे खरीप हंगामाचे शेतकरी अडचणीत, सध्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.काही शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरीप हंगामातील पीक कर्जाची उचलही केली आहे. तर काहींची कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल,अशी भाबडी आशा असलेल्या शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे.त्याचा परिणाम यंदा पीक कर्जाच्या नूतनीकरणावर होण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते.काहींना तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज वेळेत मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात कोंडी होत आहे.शेतात पेरणी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आयुक्ताच्या बॉडीगार्डची दहशत ; उर्मट बॉडीगार्डवर कारवाई करण्याची मागणी, वसई विरार शहर महानगरपालिकेत सध्या कायद्याचे राज्य राहिले नसून पोलीसराज निर्माण झाले आहे.काल एक आंदोलक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना आयुक्तांच्या बॉडीगार्डने त्याला धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.त्यानंतर त्या आंदोलकाने आक्रमक पवित्रा घेत,त्या पोलिसाला खडे बोल सुनावले.त्या तरुणांच्या आक्रमक पवित्र्याने त्या बॉडीगार्डची बोबडी वळली व तो कॅमेऱ्यापासून सतत पळ काढताना दिसला. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर एका तरुणाने आयुक्तांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बॅनर्स लावले व तो प्रवेशद्वारानजीक धरणे आंदोलनास बसला.त्याच सुमारास आयुक्तांचा बॉडीगार्ड आर.डी.मेश्राम हा घटनास्थळी आला आणि त्याने सदर तरुणास धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.तसेच…
दीपक मोहिते, आम्ही काय पाप केले ? जिल्हावासियांच्या मनात एक ना अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत आहे.या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकार व नवनिर्वाचित लोकप्रतिधीनीकडून अपेक्षित आहेत.पण सरकार व लोकप्रतिनीधीची या सर्व प्रकरणी असलेल्या उदासीनतेमुळे ती मिळतील,असे वाटत नाही. १ ) गेल्या वर्षभरात सरकारने वसई तालुक्याच्या विकासासाठी कोणत्या योजना मंजूर केल्या ? २ ) वसई / विरार उपप्रदेशाची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना विविध कारणामुळे गेली अनेक वर्षे रखडली आहे,तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढणे,अपेक्षित होते.ते का झाले नाही ? आजही ही योजना मार्गी लागू शकलेली नाही. ३ ) वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या व नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन एखादे आर्थिक पॅकेज द्यावे,…
नदीम शेख,पालघर शिवसेनेच्या ज्योती मेहेर यांची अध्यक्षपदी निवड, गेली पंचवीस वर्षे राजकीय,सामाजिक, सहकारी,शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या सेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर यांची महाराष्ट्र राज्य सह.सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आल्या.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी त्या सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीवर निवडून आल्या होत्या.त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून झाली.त्यानंतर त्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ,ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष व विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सचिव होत्या.सध्या त्या विद्यमान सदस्या आहेत. मच्छिमार कृती समितीच्या पालघर ठाणे जिल्हा महिला संघटक व महाराष्ट्र राज्य मच्छीमार…
दीपक मोहिते, नायगाव – चंद्रेपाडा गावात ” पाणी बचत,” चे यशस्वी मॉडेल, दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस तळ गाठणारा चंद्रपाड्याचा पाझर तलाव यंदा मे महिन्याच्या अखेरीसही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा टिकवून आहे.ही कामगिरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनबद्ध कारभारामुळे शक्य झाले आहे. दरवर्षी चंद्रपाडा व आजुबाजूच्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. नायगाव पूर्वेस असलेल्या चंद्रपाडा परिसरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली.त्याचा परीणाम पाणीपुरवठ्यावर होत असतो.पाऊस पडेपर्यंत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते.तर शेकडो नागरी संकुलाना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार लोकरे यांच्या नेतृत्वाखाली या भीषण समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आल्या.यंदा…
वसंत भोईर,वाडा आवंढे गावात जमिनीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला, जमिनीच्या वादातून तालुक्यातील आवंढे गावात तुफान हाणामारी झाली असून लोखंडी सळया,लाठ्याकाठ्या दगडाने चढवलेल्या हल्ल्यात दीर व वहिनी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.दरम्यान या हल्ल्यातील आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. निखिल पाटील ( वय ३३ ) भाविक पाटील, एकनाथ पाटील,जगन्नाथ पाटील,धिरज पाटील,रोहीणी पाटील,काया पाटील,निलम पाटील,हस्ती पाटील सर्व रा.आवंढे अशी आरोंपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आवंढे गावाच्या हद्दीत गट नंबर ११८ येथे नविन बांधकाम सुरू असलेल्या घरावर पाणी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वादग्रस्त भुजबळ यांना ओबीसी समाजाने तारले, राज्याचे वादग्रस्त नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल मंत्रीपदावर वर्णी लावल्यामुळे भुजबळ यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.हा निर्णय घेताना अजित पवार यांनी नैतिकता गुंडाळून ठेवत,त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लावली आहे.या घटनेचे वर्णन करायचे झाल्यास एक वादग्रस्त बाहेर पडला,तर दुसरा वाजतगाजत त्याच्या मंत्रीपदावर विराजमान झाले,असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टोळीत स्वतः अजित पवार,खा.सुनील तटकरे, खा.प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफ,माणिकराव कोकाटे,व आता छगन भुजबळ यांची वर्णी लावून त्यांनी भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.अजित पवार…
