वसंत भोईर,वाडा
आवंढे गावात जमिनीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला,
जमिनीच्या वादातून तालुक्यातील आवंढे गावात तुफान हाणामारी झाली असून लोखंडी सळया,लाठ्याकाठ्या दगडाने चढवलेल्या हल्ल्यात दीर व वहिनी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.दरम्यान या हल्ल्यातील आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
निखिल पाटील ( वय ३३ ) भाविक पाटील, एकनाथ पाटील,जगन्नाथ पाटील,धिरज पाटील,रोहीणी पाटील,काया पाटील,निलम पाटील,हस्ती पाटील सर्व रा.आवंढे अशी आरोंपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आवंढे गावाच्या हद्दीत गट नंबर ११८ येथे नविन बांधकाम सुरू असलेल्या घरावर पाणी मारण्यासाठी फिर्यादी याचा लहान दिर हरेश्वर पाटील हे गेले असता सर्व आरोपी गेले होते.त्यावेळी हरेश्वर यांना आरोपींनी खेचून लोख॔डी सळई बांबुने मारहाण करायला सुरुवात केली.या मारहाणीमध्ये हरेश्वर यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना इजा झाल्या.हरेश्वर यांची वहिनी अश्विनी त्यांना सोडवण्यासाठी गेली असता त्यांनाही मारहाण करीत आरोपीनी त्यांच्या डोक्यात दगड घातला.आजूबाजूच्या नागरिकांनी सदरचा वाद सोडवला.गंभीर जखमी झालेल्या हरेश्वर व अश्विनी यांना ठाणे येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेतील सर्व आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार गणेश सोनावणे करीत आहेत.

