वाडा प्रतिनिधी,
कुडूस येथे अज्ञात इसमांकडून शिक्षकाला बेदम मारहाण,
तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रमोद थालके यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून लाठी काठ्या सळईने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात थालके हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
सदर घटना काल सायं.६.०० च्या सुमारास डोंगस्ते गावच्या हद्दीत घडली.या हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेत प्रमोद थालके हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेतआज सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना डोंगस्ते गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी अडवून त्याच्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी लाठ्या काठ्या व लोखंडी सळईने जोरदार हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.आजुबाजूला असलेल्या महिलांनी आरडाओरड केल्यामुळे हल्लेखोर पळून गेले.दरम्यान त्यांच्यावर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
कुडूस पोलीसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

