- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,
- केंद्रीय निवडणूक आयोगाची विश्वासार्हता व पारदर्शकता पार लयाला गेली,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” आम्हा मतदारांची सनद,” १ ) शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरीत होणार ? हस्तातरण प्रक्रियेत कोणत्या अडचणी आहेत. २ ) महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी,दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा मुहूर्त कधी ? वर्षानुवर्षे अशीच लूट होत राहणार का ? ३ ) शहरातील करदात्यांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा कधी उपलब्ध होणार ? ” आपला दवाखाना,” योजनेची सद्यस्थिती पाहता,ही व्यवस्था फार काळ चालणार नाही,असे करदात्यांना वाटते ? त्यामध्ये किती तथ्य आहे ? ४ ) शहरातील पाच उड्डाणपूल व रिंगरुट रखडण्यामागची नक्की कारणे काय होती ? महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले…
दीपक मोहिते, स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे चर्चेत असतील,याविषयी काही प्रमुख राजकीय पक्ष अंदाज घेत आहेत.विकासाचे स्थानिक प्रश्न,लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार व लाडक्या बहिणीवर कमी झालेला योजनेचा प्रभाव,” आनंदाचा शिधा,” योजनेचा झालेला बट्ट्याबोळ,उद्धव व राज ठाकरे बंधूंचे मनोमिलन,हे सारे मुद्दे प्रचारात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच या निवडणुका वेळेवर होतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व निवडणुका पुढील महिन्यात होतील,असा अंदाज व्यक्त होत असताना निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्याचे पुनर्निरिक्षण करण्याची झालेली घोषणा व राज्य सरकारने या निवडणुका काही काळ पुढे…
वसंत भोईर, कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक, तालुक्यातील गौरापुर कातकरी वाडी येथील १० वर्षे शालेय वयोगटातील आदिवासी कातकरी मुलीला उत्तन येथे मच्छी वाळवणे आणि घरगुती कामे करण्यासाठी जबरदस्तीने बालमजूर म्हणून राबवण्यात आले,अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुलीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपी ज्युलीयाना लेजली पाटील ( रा. उत्तन चौक,भायंदर वेस्ट, ठाणे) हिने मुलीला घरकाम व मच्छी कामासाठी जोरजबरदस्तीने घेऊन गेली व काम न केल्यास शिवीगाळ व मारहाण केली.गेल्या वर्षी गणपती सणापासून ते जून २०२५ पर्यंत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध घरकामासाठी वापरले गेले,तसेच आगाऊ बयाणा रक्कम कुटूंबियांना देण्यात आली.काल…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज…. औद्योगिक,शैक्षणिक,राजकीय व सामाजिकदृष्टया प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात घसरण का होत आहे ? हा चिंतेचा विषय असून त्याचे पडसाद आता उमटु लागले आहेत.दरडोई आर्थिक उत्पन्न वाढले असले तरी महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यजन होरपळुन निघत आहे.” शिक्षणाचा अधिकार,” कायदा मंजूर होऊनही ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढू शकले नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी – सुविधा क्षेत्रातही गेल्या ७५ वर्षात भरीव काम होऊ शकले नाही.वीजनिर्मिती,उद्योगधंदे,कृषीक्षेत्र, रोजगारनिर्मिती,या प्रमुख ज्वलंत विषयाकडे एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.सन २००५ पर्यंत वीजनिर्मितीचा एकही प्रकल्प मार्गी लागू शकला नाही.एनरॉन वीज प्रकल्पाचे काय झाले ? याविषयी न…
दीपक मोहिते, जेव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…. वसई तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा व भलेमोठे खड्डे,यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.भाजप व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांची उणीदुणी काढत उरावर बसत आहेत,त्यामुळे वसई तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मात्र रस्त्यावरील हे खड्डे सुद्धा आता बोलायला लागले आहेत.” आम्हा खड्ड्याचा यामध्ये दोष तो काय ? आम्हाला कोणी जन्माला घातले ? आमचे डांबर कोणी चोरले ? ” खड्डेमय रस्ते,” असे नामकरण कोणी केले ? आमच्या जखमांवर पॅचवर्क करण्याच्या नावावर ओरबाडून खाणारे कोण ? असे एक ना अनेक प्रश्न हे खड्डे आता विचारू लागले आहेत.त्या बिचाऱ्या खड्ड्याना त्यांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळू शकणार…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतील.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या डिसें. महिन्यात पार पाडण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे,त्यादृष्टीने आयोग कामाला लागला आहे.या निवडणूक होण्याअगोदर बहुचर्चित बिहार राज्याच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणूक ६ व ११ नोव्हे.रोजी होत आहेत.त्याची मतमोजणी १४ नोव्हे.रोजी होणार आहे.बिहारच्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत असून या निवडणुकीचे निकाल दूरगामी परिणाम करणारे असतील,त्यामुळे केंद्र सरकार काहीतरी खुसपट काढून आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचे मनोमिलन व अन्य विरोधी पक्षाची झालेली एकजूट,अशा…
दिपक मोहिते, एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस, आज दिपावलीच्या शुभमुहूर्तावर वसईतील एका होतकरू तरुणाचे समाज माध्यम क्षेत्रात पदार्पण होत आहे.त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्राला अवकळा आली असताना,या तरुणाने या फंदात का पडावे ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला व त्याला मी यासंदर्भात काही प्रश्न विचारले,त्यांनी जे काही उत्तर दिले,त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो.तो म्हणाला,नव्याने सुरू होणारे माझे युट्युब चॅनेल हे कोणाचे बटीक म्हणून कधीही काम करणार नाही.माझे चॅनेल,हे सर्वसामान्यजनांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न,समस्या व अडचणी,यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी सक्रिय असेल.कोणाच्या सांगण्यावरून बदनामी करणे,किंवा विरोधात चालवणे,हे मला अभिप्रेत नाही.परिसर विकास,सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न व विश्वासार्हता,या अशा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणूक आयोगाची विश्वासार्हता व पारदर्शकता पार लयाला गेली, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आडमुठे धोरणाविरोधात देशातील तमाम विरोधी पक्ष सध्या एकवटले आहेत.गेल्या तीन वर्षात केंद्रीय निवडणूक आयोग हा अनेक प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.दुर्देवाने त्यांच्या या अशा वागण्याला सर्वोच्च न्यायालयाच्या काही लोकांनीही खतपाणी घातले.त्यामुळे त्यांचा आडमुठेपणा सतत वाढत चालला आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा,एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे निलंबन,मताच्या चोरीचे प्रकरण व यासंदर्भात विरोधी पक्षांनी सादर केलेले पुरावे,याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेच्या प्रश्नी निर्माण झालेली साशंकता,आदी कारणामुळे केंद्रीय निवडणूक आयोग चांगलाच अडचणीत आला आहे.केंद्रीय निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा बटीक झाला असल्याचा विरोधकांकडून सतत आरोप होत आहे.हे आरोप करताना भारतीय…
दीपक मोहिते, समर्थनचे डॉ.अशोक येंडे व प्रा. जयश्री येंडे लवकरच व्हिएतनामच्या दौऱ्यावर, हनोई,व्हिएतनाम येथे सायबर गुन्ह्यांवरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी विवेक पंडित यांच्या ” समर्थन,” संस्थेचे अध्यक्ष अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्रा. ( डॉ. ) जयश्री येंडे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना,सायबर convention – अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्राचार्या ( डॉ. ) जयश्री येंडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यांवरील करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक समारंभ २५ आणि २६ ऑक्टो.२०२५ रोजी हनोई ( व्हिएतनाम ) येथे पार पडणार आहे. अॅड. (…
दीपक मोहिते, दशक उलटल्यानंतरही पालघर जिल्हा कुपोषितच… दहा वर्षापुर्वी पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आला.जिल्हा यंत्रणेची गाडी काही अंशी रुळावर आली असली तरी जिल्ह्याने अद्याप बाळसं धरलेले नाही.यंत्रणा पूर्ण क्षमतेने आजही कार्यान्वित झालेली नाही. राज्यातील महायुतीच्या सरकारचे हे फार मोठे अपयश आहे.या जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याला निधीची कमतरता नाही.पण राज्यकर्ते पक्षाच्या प्रसिद्धीसाठी जी वारेमाप उधळपट्टी करत आहेत, त्यामुळे आज पाणी,आरोग्य, शिक्षण व वैद्यकीय सेवा क्षेत्रात भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.दहा वर्षाचा कालावधी हा कमी नाही.या काळात प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्याची गरज होती. आज जिल्ह्यातील शेतकरी,आदिवासी व स्थानिक भूमिपुत्र विविध समस्यांनी त्रस्त आहेत.रस्ते,पाणी,दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय…
