दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
भाई उर्फ जयेंद्र ठाकूर यांच्या प्रचारात हजारो तरुण सहभागी,
आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना,आ.हितेंद्र ठाकूर यांचे थोरले बंधू जयेंद्र ठाकूर यांनी गेल्या चार दिवसांपासून तिन्ही विधानसभा मतदासंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या प्रचारात तरुण,ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.त्यांच्या धुवांधार प्रचाराला शहरी व ग्रामीण भागात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधी उमेदवारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
भाई उर्फ जयेंद्र ठाकूर हे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ पदाधिकारी व विविध संस्थांचे विश्वस्तही सहभागी होत आहेत.विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात तरुण वर्गाचा मोठा भरणा पाहायला मिळतो.भाई ठाकूर यांचे सर्व समाजातील घटकांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.धार्मिक,सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाला ते सढळ हस्ते मदत करत असतात.आ.हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांनी या उपप्रदेशातील गेल्या तीस वर्षात शिक्षण,आरोग्य व वैद्यकीय सेवा या क्षेत्रात लाखो लोकांना प्रचंड मदत केली आहे.अनेक विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत मिळवून देण्यात येत असते.भाई ठाकूर पूर्वी निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या मदत करत असत,पण या निवडणुकीच्या प्रचारात स्वतः उतरल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.त्यांनी सुरू केलेल्या प्रचारात मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.त्यामुळे या निवडणुकीत आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांच्या मताधिक्यात प्रचंड वाढ होणार आहे.

