दिपक मोहिते,
एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,
आज दिपावलीच्या शुभमुहूर्तावर वसईतील एका होतकरू तरुणाचे समाज माध्यम क्षेत्रात पदार्पण होत आहे.त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्राला अवकळा आली असताना,या तरुणाने या फंदात का पडावे ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला व त्याला मी यासंदर्भात काही प्रश्न विचारले,त्यांनी जे काही उत्तर दिले,त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो.तो म्हणाला,नव्याने सुरू होणारे माझे युट्युब चॅनेल हे कोणाचे बटीक म्हणून कधीही काम करणार नाही.माझे चॅनेल,हे सर्वसामान्यजनांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न,समस्या व अडचणी,यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी सक्रिय असेल.कोणाच्या सांगण्यावरून बदनामी करणे,किंवा विरोधात चालवणे,हे मला अभिप्रेत नाही.परिसर विकास,सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न व विश्वासार्हता,या अशा तीन महत्वाच्या विषयाशी आमच्या चॅनेलची बांधिलकी आहे व ती कायम असेल.
त्यांनी माझ्या प्रश्नाला हे जे काही उत्तर दिले,त्याचे मी स्वागत केले व चॅनेलचा संपादकीय सल्लागार म्हणून जबाबदारी घेण्याच्या त्याच्या विनंतीला होकार दिला.या चॅनेलवरून जी काही बातमीपत्रे प्रसारीत होणार आहेत,त्याची स्क्रिप्ट,विविध विषयावर लेख व स्तंभ ( सोम.- फ्रंटलाईन व मंगळ.- हल्लाबोल,) मी लिहिणार आहे.स्क्रिप्ट लिहिताना विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन माझे लिखाण असेल.समाजातील अनिष्ट गोष्टीवर प्रहार,लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व लोकांचे प्रश्न यावर माझ्या लेखांचा फोकस असेल.आज जी काही युट्युब चॅनेल जिल्ह्यात सक्रिय आहेत,त्यापेक्षा हे चॅनेल काही तरी वेगळेपण दाखवण्याचे म्हणा किंवा जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यासाठी जिल्हावासीयांकडून आम्हाला फार मोठ्या नाही,पण माफक अपेक्षा आहेत.माध्यमाचा डोलारा हा दर्शक व वाचकांच्या सहकार्यावर अवलंबून असतो,ते आम्हाला अपेक्षित आहेच.चला,उद्यापासून आपण दररोज भेटूया…

