वाडा प्रतिनिधी,
वाडा येथे फटाके व्यापाऱ्याकडून खंडणी घेताना एकाला रंगेहाथ पकडले,
वाडा शहरातील दिलीप ट्रेडर्स या फटाके विक्रेत्याकडून खंडणी वसुल करताना वाड्यातील एका इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सदर घटना काल साडेआठच्या सुमारास वाडा मारूती मंदिराच्या मागे वाडा परळी रोडवरील प्रितम सेल्स एजन्सी यांच्या फटाका स्टाॅल समोर घडली.या घटनेने वाडा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निलेश चव्हाण रा.पाटील आळी,वाडा असे त्या खंडणीखोराचे नाव आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी निलेश चव्हाण याने त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरून फिर्यादी सुशील पातकर यांना व्हाॅटसअप करून फटाके विक्रीचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचेकडे १४ लाख ७० हजार रू.ची मागणी केली होती व सदर रक्कम न दिल्यास कायमचा संपवून टाकेन,अशी धमकी दिली होती.यापूर्वी जून २०२४ मध्येही फिर्यादी यांनाअशाच प्रकारे धमकावून फिर्यादी यांचेकडून ७ लाख रू.घेतले होते.यावर्षीही आरोपीने खंडणीची मागणी केली असता फिर्यादीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचला असता आरोपीने २० हजार रू.च्या नोटासह मोबाईल स्कुटी असा एकूण ५३ हजार रू.किंमतीचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आरोपी निलेश याला वाडा पोलीसांनी अटक केली असून त्याला वाडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ ऑक्टो.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्याचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

