तलासरी प्रतिनिधी,
२७ लाखाचा मुद्देमाल तलासरी पोलिसांनी केला हस्तगत,
तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत सावरोली येथील श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कंपनीच्या गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाने गोडाऊन चे शटर तोडून गाळ्यातील २७ लाख रु.किमतीचे मोटरपंप, वेगवेगळ्या प्रकारची केबल चोरून नेली होती.याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सावरोली गावातील या कंपनीने जोतिन ओंकार सिंग राहणार वापी,यास सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवले,त्याने अवघ्या दोन दिवसात कंपनीच्या गाळ्याचे शटर तोडून २७ लाख रु.चे मोटर पम्प तसेच केबल चोरून नेली.याप्रकरणी तलासरी पोलिसांनी तो तपास करून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेला मुद्देमाल बाळगणारे परवेज आलम जाफर अली खान आणि अक्रम अली अन्वर अली रा. अंधेरी मुंबई यांना अटक करून वाहनासह चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

