सचिन परब,विरार
” खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती,” कार्यशाळा संपन्न,
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या सभागृहात काल “ खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती कार्यशाळा,”संपन्न झाली.या कार्यशाळेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे व उप मुख्य लेखापरीक्षक मनोज पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धतीसंबंधी निर्गमित झालेले नवीन शासन निर्णय व कायदे,शासकीय ध्येय-धोरणे, निविदा कार्यपद्धतीत करावयाचे व झालेले बदल यासंबंधी ही कार्यशाळा पार पडली.महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन व माहिती देऊन सध्या राबवण्यात येत असलेल्या निविदा कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करणे व निविदा कार्यपद्धती नियमानुसार सुरळीत करणे,हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी निविदा प्रक्रियेविषयी विचारलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे, उपायुक्त सुभाष जाधव, उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे,उप मुख्य लेखापरीक्षक मनोज पवार, महानगरपालिकेचे सर्व सहा.आयुक्त,अभियंते, विभाग प्रमुख,संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

