नदीम शेख,पालघर
शिवसेनेच्या ज्योती मेहेर यांची अध्यक्षपदी निवड,
गेली पंचवीस वर्षे राजकीय,सामाजिक, सहकारी,शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या सेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर यांची महाराष्ट्र राज्य सह.सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आल्या.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
यापूर्वी त्या सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीवर निवडून आल्या होत्या.त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून झाली.त्यानंतर त्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ,ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष व विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सचिव होत्या.सध्या त्या विद्यमान सदस्या आहेत. मच्छिमार कृती समितीच्या पालघर ठाणे जिल्हा महिला संघटक व महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ महाराष्ट्रातील सहकारी संस्थीचे शिखर संघ जिल्हा संघाचे शिखर संघ संघावर तीन टर्म संचालिका आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी त्या निवडून आल्या आहेत.या संघावर प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा मान ज्योती मेहेर यांना मिळाला आहे.मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चे असोत किंवा आंदोलने असोत,त्या नेहमीच आघाडीवर असतात.त्या शिवसेना ( शिंदे गट ) उपनेत्या म्हणून सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

