दीपक मोहिते,
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
उठा उठा निवडणूक आली,
जोडे उचलण्याची वेळ झाली…
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
कोणी पार्थ घ्या,
कोणी रणजित घ्या,
कोणी आदित्य घ्या,
अमित घ्या,
कोणी रोहित घ्या,
अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या…
घराणेशाही बळकट करूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम,
शिंदेची प्रणिती,
तटकरेची आदिति,
गायकवडांची वर्षा,
सुळ्यांची सुप्रिया,
गांधींची प्रियंका अन मुंड्यांची प्रीतम अन पंकजा..
महिलाशक्तीचा जागर करूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
ठाकरे,महाजन,नाईक पवार,मुंडे,शाह,चौहान, चव्हाण,गांधी,मलिक आणि यादव घराणी
हीच तर देशाची खरी संपत्ती…
घराणेशाहीचा वारसा बळकट करूया…
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
चपटीतला पेग,अन मटणाचं हाडुक,
आपापल्या साहेबांच्या कथा,अन भक्तीच्या गाथा…
चवीने पोटभर चघळूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
प्रपंचाची होळी,साहेबांची राजकीय पोळी,
बकाल आयुष्याचा तांडा, पण झेंड्याचा दांडा…
झुंडीने उंच उंच मिरवूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,
जोडे उचलूया….
करतल,पादुका अन चरणस्पर्श,
हेच आपुले कर्म,अन हाच आपुला चरितार्थ…
जयजयकार अन गर्जनांनी साहेबांना वंदुया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
देशभक्त तोच..जो सीमेवर मरे,
तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मरण्यावर कोण रडे…
साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूया,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया….
नेता झाला,नेत्याचा मुलगा, आणि पुतण्या आमदार,खासदार झाला, आता नातू आला,
कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलण्यास तयार झाला..
अरे येडयांनो…
आपली परंपरा कायम राखुया,
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूया,
लेकरा बाळांची आबाळ करूया,
चला कार्यकर्ते हो ….आपण कायम सतरंज्या,जोडे उचलत राहूया….
हे लक्षात घेऊन आजपासून प्रारंभ करुया,
आवडली तर नक्की शेअर करा,

