वसंत भोईर,वाडा
वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत निरव शांतता,
वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसें.रोजी होत असून गेल्या १० डिसें. पासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही.सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.
वाडा नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून येणार आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडी,भाजपा,शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.मात्र अनेक पक्ष आतापर्यंत उमेदवार निश्चित करू शकले नाहीत.काही ठिकाणी एका प्रभागात अनेक जण इच्छुक आहेत,तर काही ठिकाणी राजकीय पक्षांकडे उमेदवार नाहीत.त्यामुळे दुस-या प्रभागातील उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.सत्ताधारी पक्षही उमेदवार अद्याप निश्चित करू शकले नाहीत.
अनेक पक्षांनी काही उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.मात्र सर्व प्रभागातील उमेदवारांचे अर्ज येत नाहीत,तोपर्यंत त्यांनीही आपल्या उमेदवारांचे मुळ अर्ज निवडणूक निर्णय अधिका-याकडे दिले नाहीत.

