मीरा भाईंदरमध्ये जनता दरबाराचे आयोजन,
दीपक मोहिते,
मीरा – भाईंदर शहरात भाजप आ.नरेंद्र मेहता यांच्यातर्फे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत शहरातील लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने काल सकाळी ११.०० च्या सुमारास अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमास आमदार,मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त,पोलीस,तलाठी,वन व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच मीरा – भाईंदर शहरातील नागरिक☝️ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता दरबारमध्ये उपस्थित नगरिकांनी गणेश नाईक यांचे आपल्या तक्रारीकडे लक्ष वेधले, पालकमंत्र्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली व त्याचे निवारण केले.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मीरा – भाईंदर शहरात यापूर्वी देखील जनता दरबार आयोजित करण्यात आले होते,त्यामुळे शहरातील लोकांना जनता दरबार काही नवीन नसल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.
जन-सामान्यांच्या भावना ओळखून त्यांना दिलासा देण्यासाठी आज मीरा – भाईंदर शहरात आपण आल्याचे नाईक म्हणाले,नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महानगरपालिका निवडणूकीमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते.त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा होणार आहे.प्रताप सारनाईक व नरेंद्र मेहता जनता दरबार घेत असतात, मात्र त्याच्यापलीकडे जाऊन काही अडचणी असतील ( मॅनग्रोव्हज, मिठागर, ) त्या सोडवण्यासाठी दरबार आयोजित करण्यात आला होता.लोकांच्या जमिनीवर काहीवेळा वनखाते हक्क दाखवते.त्याबाबत चर्चा करून प्रश्न सोडवण्यात आला आहे.पूर्वी केंद्र सरकारच्या जागांवर मिठागरे झाली,मात्र खाजगी लोकाकडून त्यावेळी मागणी करण्यात आली होती की त्याच्या खाजगी जागेत त्याना मिठागरे निर्माण करायची आहेत.ज्यांची सातबारावर नावे असतील व त्या ठिकाणी मिठागर असेल अशा ठिकाणी केंद्रीय पातळीवर जाऊन मुळ शेतकऱ्यांच्या जागा त्याच्या कशा होतील,यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
मीरा – भाईंदर महानगर पालिकेच्या परिसरात टोल नाका हटवण्यासाठी कुठेही रुंद जागा उपलब्ध नाही.दहिसर टोल नाक्यासाठी जर जकात नाक्याची जागा मिळाली तर नक्की प्रश्न सुटू शकतो.पालघर जिल्ह्याच्या हद्दीत दहिसर टोलनाका स्थलांतरीत केल्यास ठाण्याच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.यासाठी सारनाईक यांना भेटून चर्चा करून त्यांच्या कल्पना आपण जाणून घेउन मार्ग काढण्यात येईल,असे नाईक यांनी सांगितले.मीरा – भाईंदर शहरातील अनेक प्रश्न विविध विभागाकडे प्रलंबित आहेत.अनेकदा लोकांना शासकीय कार्यालयात गेल्यावर धक्के खावे लागतात. मात्र आज मीरा – भाईंदर शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये सर्व अधिकारी उपस्थित असून जागेवरच निर्णय घेण्यात आल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असल्याचे आ.नरेंद्र मेहता यांनी सांगितले.जनता दरबार कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोक विविध तक्रारी, अडचणी व प्रश्न घेऊन आले होते.गेल्या अनेक महिन्या पासून प्रलंबित असलेले प्रश्न काही क्षणात या दरबारात सुटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला,यावेळी त्यांनी उपस्थित सर्वं नागरिकांचे आभार मानले.

