दीपक मोहिते,
वसई पूर्व भागातील बविआच्या माजी नगरसेविकासह शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल,
” आधी राष्ट्र,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा व बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविकासहित पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,उबाठा गटातील प्रमुख पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी काल ९ नोव्हें. रोजी भारतीय जनता पक्षात भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे भव्य प्रमाणात जाहीर प्रवेश केला.
या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते नवीन कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले.
आज पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका – शकुंतला नागेश शेळके,ब.वि.आ.चे शिवाभिमनगर,वालिव युवा अध्यक्ष – गणेश गजानन धुमाळ,श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष – नागेश शेळके,ब.वि.आ.चे वेलीचापाडा,वालीवचे समाजसेवक – रोहीत पाटील,ब.वि.आ.चे धुमाळनगर,वालीवचे समाजसेवक – जयेश हेमंत धुमाळ,बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक – कल्पेश जगन मोहीते,भारतीय लहुजी सेनाचे पालघर जिल्हा प्रमुख – वेरशी भानुशाली,ब.वि.आ.चे भोईदापाडा,महाराष्ट्र वाहतूक सेना – अंकुश सिताराम शेळके,ब.वि.आ.चे उत्तर भारतीय महासंघ अध्यक्ष – अनिल धनी सिंह,ब.वि.आ. कार्यकर्ता – राहुल सुमेरी,ब.वि.आ.कार्यकर्ता – प्रकाश विटकर,शिवसेना उ.बा.ठा.चे भोईदापाडा शाखा प्रमुख – शशिकांत अवघडे,शिवसेना उ.बा.ठा. कार्यकर्ता – आकाश मालेकर,ब.वि.आ. कार्यकर्ता – उमेश नूलकर,ब.वि.आ. कार्यकर्ता – दगडु उत्तम वाघ,ब.वि.आ. कार्यकर्ता – बबन वाघ,ब.वि.आ.कार्यकर्ता – बाबु रविंद्र नायर,ब.वि.आ.कार्यकर्ता – विनायक भोईर,ब.वि.आ. कार्यकर्ता – कु.बादल लालसुंदर चौधरी,
ब.वि.आ.कार्यकर्ता – पप्पु शहाणी,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,उपाध्यक्ष – किशोर मोहीते,ब.वि.आ. कार्यकर्ता – कैलास मोहीते यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जोशात भाजपा प्रवेश केला.
सदर कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस माधवी नाईक,भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे,जिल्हा सचिव नंदकुमार महाजन,वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,महाराज मिश्रा,विकास बरणवाल व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये भाजपाचा विजय निश्चित झाला आहे.

