- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राज्यकर्त्यांचा करंटेपणा.. आपली वैद्यकीय सेवा रामभरोसे, केंद्र व राज्य सरकार सध्या रस्तेबांधणीच्या विकासकामावर कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे.शहरी भागातील अंतर्गत रस्ते बांधणी,शहराना एकमेकांशी जोडण्यासाठी आवश्यक असलेले जलदगती महामार्ग व समृद्धी महामार्ग उभारणी, असा धडक कार्यक्रम राबवत आहे. एकेकाळी ” बंबई नगरी सबसे प्यारी,” ” बंबई मेरी जान,” ” बंबईसे आया मेरा दोस्त,” अशा प्रकारची गाणी आपण गुणगुणत असू.आज सारं काही बदलत चाललंय..आता ” बंबई नगरी,सबसे खतरी,” ” बंबई से गया मेरा दोस्त,” “बंबई मेरा दुश्मन,” असे म्हणायची पाळी आपल्यावर आली आहे.पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने आपल्या वैद्यकीय सेवेच्या मर्यादा स्पष्ट केल्या.गेल्या ६५ वर्षात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आपण नवीन सरकारी…
दीपक मोहिते, ” मान्सूनचे आगमन, ” मे अखेरीस राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून येत्या २४ तासांत ते अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळाला “शक्ती,”असे नाव देण्यात आले आहे.हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवर ताशी ६० कि.मी.वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे,तर मुंबईसह उर्वरित कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २० मे पासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात…
दिपक मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पालघर जिल्ह्यातील अस्तित्व नगण्य, काल आपण मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ( एकनाथ शिंदे गट ) निलेश तेंडुलकर यांची मुलाखत घेतली.त्यानंतर काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) गटाच्या जिल्हाध्यक्षांची मुलाखत घेण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करत होतो,पण आमच्या या प्रयत्नाला त्या पक्षाकडून यत्किंचितही प्रतिसाद मिळाला नाही.तो का मिळू शकला नाही,हे आजच्या मुलाखतीमधून स्पष्ट होणार आहे.दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर सांयकाळी एक आशेचा किरण आम्हाला दिसला.शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने news27.in ला कॉल करून,माझे नाव न छापण्याच्या अटीवर मी मुलाखत देण्यास तयार असल्याचे कळवले.त्यास आमच्या वेबपोर्टलने मंजुरी दिली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कशा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ठाकरे व पवार हे ब्रँड त्यांच्या पुतण्यानीच संपवले… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये केलेली काही वक्तव्ये ही वस्तुस्थितीला धरून नाहीत.आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी,राज्यात ठाकरे व पवार हे दोन ब्रँड असून ते संपवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले.वास्तविक ठाकरे व पवार हे दोन ब्रँड आहेत,हे मान्य,पण हे दोन्ही ब्रँड संपवण्याचे काम त्यांनी व पवार कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अजित पवार या दोघांनी पद्धतशीरपणे केले.राज यांनी २० वर्षांपूर्वी २७ नोव्हें.२००५ रोजी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली.त्यावेळी केलेल्या आपल्या घणाघाती भाषणात ” चार कारकुनांच्या कंपूच्या पापात आपल्याला वाटेकरी व्हायचे नाही.शिवसेना प्रमुखच आपले दैवत आहे,मात्र दैवत असलेल्या आमच्या…
दीपक मोहिते, ” असंवेदनशीलता,” रुपाली चाकणकर यांच्या कार्यकिर्दीत महिलांना न्याय मिळू शकणार नाही… वैष्णवी हगवणे,मृत्यूप्रकरणी आपले सरकार व महिला आयोगाच्या अध्यक्षा किती असंवेदनशील आहेत,हे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झाले आहे.घटना घडल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वैष्णवी यांच्या माहेरच्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात.हा प्रकारच मुळात संतापजनक आहे.वैष्णवी हगवणे यांचे सासरे व त्यांची मुले हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबधित आहेत.त्यामुळे घटना घडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकार व महिला आयोगाने वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले होते.सदर प्रकरणी मीडिया व विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, महिला आयोगाच्या अध्यक्षा व पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्या. मिडियाने…
वसंत भोईर,वाडा स्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप, वाडा तालुक्यातील पालसई जिल्हा परिषद गटातील नविन रस्ते बांधणीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी,सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार व वाडा यांना निवेदन देऊन निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाडा तालुक्यातील पालसई जिल्हा परिषद गटातील दहा ग्रामपंचात हद्दीतील गोरगरीब आदिवासी नागरीक राहत असलेल्या गावपाड्यांना व वस्त्यांना जोडण्यासाठी ६० रस्ते मंजुर झाले असून त्याची कामे देखील सुरु झाली आहेत.या रस्त्यांची ग्रामस्थांनी पाहणी केली असता अंदाज पत्रकानुसार कामे होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सबंधित ठेकेदाराने रस्ते माती भराव न करता रेत व खडी टाकून डांबर टाकण्यात आले आहे.त्यामुळे हे…
दीपक मोहिते, वसई विरार शहर महानगरपालिकेत यावेळी आमचीच सत्ता – निलेश तेंडुलकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे पडघम आतापासून वाजू लागले असून भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही पक्षाच्या नेत्यानी या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे जाहीर केले आहे.पण स्थानिक पातळीवर मात्र वेगळा सूर उमटू लागले आहेत.या निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी news27.in media शी संवाद साधला.त्यांनी या मुलाखतीमध्ये जे काही सांगितले ते आम्ही जसेचे तसे प्रसिद्ध करत आहोत.हा संवाद…
दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायला सुगीचे दिवस पण,मत्स्यउत्पादनात होणारी घट रोखण्याची गरज, राज्यातील मत्स्यव्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायिकांना शेतकऱ्यांप्रमाणे वीजदरात सवलत,किसान क्रेडिट कार्डची सुविधा,कृषी दरानुसार कर्ज,विमा,सौरऊर्जेतील लाभ इ.सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बंदरे व मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दोन्ही सभागृहांमध्ये मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊ,अशी घोषणा केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. दरम्यान देशाला परकीय चलन तसेच प्रथिनयुक्त अन्न पुरवण्यात मत्स्यव्यवसायाचे मोठे योगदान आहे.राज्य ” कृषी,” प्रमाणे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही चांगले उत्पादन घेण्यास सक्षम आहे. या निर्णयामुळे सुमारे…
जव्हार प्रतिनिधी, धानोशी-जव्हार येथे खरीपपूर्व शेतकरी शिबिर संपन्न, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत धनोशी येथे खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. पाच दिवसीय शिबिरात जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत आणि तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.शिबिराचा उद्देश आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक माहिती,मार्गदर्शन आणि शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षण देणे हा होता.या शिबिराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, सुधारित शेतीपद्धती, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.कृषी विभागाच्या एटीएमए अंतर्गत कार्यरत ब्लॉक…
वसंत भोईर,वाडा कुडूस मध्ये वार्षिक बाजाराला सुरुवात… सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कुडूस येथील वार्षिक बाजार भाव काल सायंकाळी निश्चित करण्यात आले असून आजपासून बाजाराला सुरवात होणार आहे.या बाजारात विकण्यासाठी आलेल्या मालाचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार हळद- २३० रू. किलो,धने-२५०,राई-१०० रु. किलो, मेथी-१००,जिरे-३००, खोबरे – २७५, ओवा-२३०,मोठा कांदा-१५ रु. लहान कांदा-१२ राजीने-२४०,सफेद लसूण-१००,लाल लसूण-१९०,चिंच-१६०,शेपू- २२० असे भाव निश्चित करण्यात आले आहेत. ठरलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकत घेऊ नये,असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाडा,भिंवडी, शहापूर,मुरबाड,जव्हार, डहाणू ,विक्रमगड,वसई,पालघर,ठाणे,नवीमुंबई,पनवेल आदी ठिकाणांहून शेतकरी पावसाळ्यात लागणा-या वस्तूंची बेगमी करून ठेवण्यासाठी या बाजारात येत असतात. शेतक-यांना लागणा-या…
