- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आयाराम गयारामचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अमानुष घटना उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमजीवीतर्फे स्वातंत्र्यदूत सन्मानाने गौरव, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सलग दोन दिवस उजेडात आल्या आहेत. आदिम कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचे तीन ज्वलंत धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आल्या.वाड्यातील घटना उघडकीस आणणारे मोतीराम वारे,शहापूरमधील घटनेला आळा घालणारे संजय मुकणे तर जव्हारमधील घटना कमलाकर वाघ यांच्यामुळे उघडकीस आली.त्यांना आज श्रमजीवी संघटनेच्या आयोजित विशेष कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेकडून देण्यात येणारे विशेष बहुमान स्वातंत्र्यदूत या पुरस्काराने, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित व संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत परळी परिसरातील बुधावली…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी येथे कविता वाचन स्पर्धेचे आयोजन, आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे कला अकादमी व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कविता वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. बी.ए.राजपूत हे अध्यक्षस्थानी होते.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात,प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे,सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे,आपली बोलीभाषा अभिमानाने बोलली पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली भाषा श्रेष्ठ राहावी या हेतूने प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मायबोलीवर प्रेम केले पाहिजे. आपल्या भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न…
वाडा प्रतिनिधी, आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांची गळफास घेऊन आत्महत्या, वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे. देविदास परशुराम नवले – १५ व मनोज सिताराम वड – १४,अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते बिवळपाडा व दापटी ता.मोखाडा येथे राहणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे.येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ४५० विद्यार्थी निवासी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदिवासी पालघर जिल्ह्याची ओळख वेगाने बदलत चालली आहे, सरकार दरबारी पालघर जिल्ह्याची ओळख ” आदिवासी जिल्हा,” अशी असली तरी आता त्यामध्ये झपाट्याने बदल होत असून हा जिल्हा आता ” प्रकल्पग्रस्त जिल्हा,” म्हणून ओळखू लागला आहे.केंद्र व राज्य सरकार,एका मागून एक असे अनेक विनाशकारी प्रकल्प या जिल्ह्यावर लादू पाहत आहे.या जिल्ह्याला लाभलेला निसर्गरम्य समुद्र व पूर्व भागातील विपुल वनसंपदा जिल्ह्याच्या मुळावर आले आहे. १९८० – ९० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची या जिल्ह्यावर विशेष करून वसई तालुक्यावर वक्रदृष्टी पडली व जिल्ह्याच्या वाताहतीला सुरुवात झाली.वाढवण व अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व २,वाढवण काँग्रेस व…
सचिन सावंत,वसई वसई शिवसेनेचे ( उबाठा ) तहसीलदाराना निवेदन, वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) शिष्टमंडळाने काल वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.तहसीलदाराना भेटण्यास गेलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी केले. तहसीलदाराना देण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनात राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी शासनाकडून सतत होणारी चालढकल,अवकाळी पाऊस,गारपीटी,हमीभाव,शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनामध्ये झालेली वाढ,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणे व पीक विमा योजनेच्या जाचक अटी शिथिल करणे,इ.मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे व पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
दीपक मोहिते, नागपूर येथे ” मराठाभुषण,” पुरस्कार सोहळा थाटात संपन्न, अखिल भारतीय मराठा महासंघाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने नागपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ,नागपूर येथे नुकतेच मराठाभूषण पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार वितरण सोहोळ्यात समाज व अन्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा ” मराठाभूषण,” पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप,राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे,राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, प्रदेश महिला अध्यक्षा वंदना रोटकर,प्रदेश युवा सचिव गौरव होणे,राम मुळ्ये, अकोला,पालघर,कोल्हापूर,व महाराष्ट्रातील इ.मान्यवर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक,उद्योजक,क्रीडा, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या तेरा…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” महानगरपलिका निवडणुका मार्च – एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता… महानगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांचे भवि्तव्य इव्हीएम मशिन्सच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. दरम्यान निवडणूक आयोग इतर राज्यातील इव्हीएम मशिन्स आणून निवडणूक जाने. महिन्यात होऊ शकतात का ? याविषयी पडताळणी करत आहे.मात्र या पर्यायाला राज्यातून विरोध होण्याची शक्यता आहे.तसेच आयोगाने हा पर्याय स्विकारला तर प्रकरण न्यायालयात जाईल व निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडतील,असे निवडणूक विषयक तज्ञाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणुका जाने.अखेरपर्यंत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असला तरी ‘ईव्हीएम,’ च्या उपलब्धतेवरच ते शक्य होणार आहे. महापालिकांसाठी वेळेत ‘ईव्हीएम,’ उपलब्ध न झाल्यास महापालिकांच्या निवडणुका या…
वाडा प्रतिनिधी, श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन, तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या प्रश्नांवर आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी ‘ कोण म्हणतो देणार नाय;घेतल्याशिवाय राहणार नाय,’अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील निराधार महिलांना के.वाय.सी. करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच सरसकट योजनांचा लाभ देण्यात यावा,अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना अमृत आहार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असुन या महिलांसाठी तत्काळ आहार उपलब्ध करून देण्यात यावा, तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये परिचारिका निवासी राहणे आवश्यक आहे मात्र निवासी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होते निवासी राहत नसलेल्या डाॅक्टर व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात…
वाडा प्रतिनिधी, वाडा नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर,ख़ुशी कम,जादा गम, वाडा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभागृहात वाड्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व ५० टक्के महिला आरक्षणाची सोडत चीट्ठीच्या माध्यमातून काढण्यात आली.यावेळी प्रभाग क्रमांक -१,२,८,११ हे प्रभाग अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून यापैकी प्रभाग क्रमांक-२ व ८ हे अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित झाले आहेत.तर प्रभाग क्रमांक-१४ हा प्रभाग अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक-३,७,११,१३,१६ व १७ हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक -३,७,१७ हे प्रभाग महिला…
वाडा प्रतिनिधी, कुडूस येथे अज्ञात इसमांकडून शिक्षकाला बेदम मारहाण, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रमोद थालके यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून लाठी काठ्या सळईने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात थालके हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सदर घटना काल सायं.६.०० च्या सुमारास डोंगस्ते गावच्या हद्दीत घडली.या हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेत प्रमोद थालके हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेतआज सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना डोंगस्ते गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी अडवून त्याच्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी लाठ्या काठ्या…
