दीपक मोहिते,
” नि:शब्द,”
मायबाप सरकारच शिक्षण व्यवस्थेच्या जीवावर उठले आहे,
आपल्याकडे मौजेच्या वस्तू नाहीत म्हणून आमची मुले नाराज होतात,आणि दूसरीकडे सुन्न करणारे
वास्तव पाहुन काळीज तुटत आहे,७९ वर्षापुर्वी यासाठी केला होता का स्वातंत्र्याचा अट्टाहास ?
प्रश्न मोठा जटील आहे, उत्तर देखील कोणाकडेही नाही.सरकारने शिक्षणाचा अधिकार मंजूर केला पण. तो प्रत्यक्षात किती अमलात आला ? शोध कुणी घ्यायला तयार नाही,
ऐकायला,पाहायला मिळते ती साक्षरता वाढल्याची आकडेवारी, ती किती खरी,किती खोटी ? हे त्या परमेश्वरालाच माहित…
समता,समानता, हक्क व अधिकार हे शब्द केवळ ऐकण्यासाठी बरे वाटतात, पण गेल्या आठ दशकामध्ये शहरी-ग्रामीण अशी जी दरी निर्माण झाली आहे, ती आपण कमी करु शकत नाही.
अंग झाकायला धड़ चिंधी नाही, फाटक्या पिशवीत वह्या पुस्तके नाहीत,शाळेत बसायला बाके नाहीत,शिकवायला शिक्षक नाहीत,तरीही ” *मेरा भारत महान*”
जोवर तरुणवर्ग पेटून उठत नाही, तोवर हे असचं अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. सुदैवाने आता तरुण जागा झाला आहे.
निवडणुका येतील,जातील सरकारे बदलतील परंतु परिस्थिती मात्र ” जैसे थे,” च राहील, हे त्याला ज्ञात झाले असून तो आता ” शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो,” अशा आवेशात रस्त्यावर उतरला आहे.
शिक्षण क्षेत्राच्या दुरावस्थेमुळे आज देशाच्या अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. ( वारंवार पेपर लीक होणे, रोजगार निर्मित शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातील शाळामध्ये अपुरा शिक्षकवर्ग, शाळांच्या मोडक्या व गळक्या वास्तू, आश्रमशाळा व अंगणवाड्या या चांगल्या योजनाचा झालेला बट्ट्याबोळ, व्यवस्थेत असलेल्या सोयी – सुविधाचा उडालेला बोजवारा, ) अशी अनेक कारणे, विद्यार्थ्यामध्ये असलेल्या असंतोषामागे आहेत. या दुरावस्थेची गांभीर्याने दखल घेण्याऐवजी सरकार ही आंदोलने चिरडण्यासाठी बळाचा वापर करत आहे. शिक्षण व्यवस्थेतील ही दुरावस्था ही मानवनिर्मित आहे. त्याविरोधात आवाज उठवणे, हा देशद्रोह कसा ठरू शकतो ? पण आपले सरकार विद्यार्थ्यांचे हे आंदोलन देशविरोधी असल्याचे ठरवून ते चिरडण्याच्या प्रयत्नाला लागले आहे.

