दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकनची पीछेहाट ; ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार,
अतिरेकपणा फार काळ चालत नाही, हे अमेरिकन जनतेने आज दाखवून दिले आहे. ट्रम्प प्रशासनाचे युद्धाखोरीचे धोरण जनतेला मान्य नाही, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. सिनेटच्या झालेल्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाने ५२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजुन आठ जागांचे निकाल हाती यायचे आहेत. या निकालामुळे ट्रम्प यांना आता मनमानी कारभार करता येणार नाही.
या सिनेट निवडणुकीत १०० जागांपैकी डेमोक्रॅट्सनी ५२ जागा तर रिपब्लिकनना ४० जागा मिळाल्या असून डेमोक्रॅट्सनी निसटता पण निर्णायक विजय मिळवला आहे. हा ५२ जागांचा आकडा ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. सिनेटमध्ये ५२ जागांसह डेमोक्रॅट्सकडे आता बहुमत आहे. ट्रम्प यांचा कोणताही मोठा अजेंडा – जसे इमिग्रेशनवर कठोर कायदा,संरक्षण खर्चात वाढ ओबामा केअर रद्द करणे, किंवा टॅक्स कट – इ. विषय सिनेटमध्ये मंजूर होऊ शकणार नाहीत. डेमोक्रॅटस बहुमत नेता कोणतेही विधेयक मतदानासाठी आणणारच नाही.ट्रम्प यांना आपले मंत्री, फेडरल जज, आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी सिनेटची मंजुरी लागते. ५२ डेमोक्रॅट सिनेटर्स आता या नियुक्त्या रोखू डेमोक्रेट्स शकतात. विशेषतः कट्टर उजव्या विचारांच्या न्यायाधीशांची नियुक्ती होणे अशक्य होणार आहे.
*सिनेटच्या सर्व महत्त्वाच्या समित्या – न्याय समिती, गुप्तचर समिती, परराष्ट्र संबंध समिती – आता डेमोक्रॅट्सच्या हातात येतील. याचा अर्थ ट्रम्प प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयाची चौकशी, समन्स, आणि सुनावणी सुरू होईल. प्रशासनाला दररोज कायदेशीर लढाई लढावी लागेल. रिपब्लिकनकडे फक्त ४० जागा राहिल्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणूनही प्रभावी ठरणार नाहीत. व्हाईट हाऊसने काढलेले कार्यकारी आदेश देखील डेमोक्रॅट-नियंत्रित सिनेट कोर्टात आव्हान देऊन रद्द करून घेऊ शकतात. थोडक्यात, हा ५२ जागांचा निसटता विजय नसून ट्रम्प प्रशासनाच्या उरलेल्या दोन वर्षांसाठी हा एक लंगडा कार्यकाळ बनवणारा निकाल आहे. ट्रम्प यांना आता डेमोक्रॅट्ससोबत तडजोड केल्याशिवाय एकही मोठे काम करता येणार नाही.

