दीपक मोहिते,
एपस्टीन फाईल ( भाग क्र. १ )
एपस्टीन फाईल ; अनेकांचे चेहरे समोर येणार…
*जेफ्रि एपस्टीन हा आज आपल्यात हयात नाही. त्याने १० ऑगस्ट २०१९ मध्ये मॅनहॅटन तुरुंगात आत्महत्या केली. जर त्याने आत्महत्या केली नसती तर त्यांची हत्याच झाली असती.
*२० जाने. १९५३ साली त्याचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्याचे वडील एका पार्क डिपार्टमेंटमध्ये माळी होते. त्यामुळे जेफ्रिचे शिक्षण अर्धवट राहीले.* *१९७३ मध्ये त्याने डाल्टन स्कुलमध्ये गणित व भौतिक शास्त्राचा शिक्षक म्हणून काम केले. या शाळेत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांमुळे वॉल स्ट्रीटवर असलेल्या बिअर स्ट्रीम्स या बँकेत त्याला नोकरी मिळाली. सन १९८२ मध्ये त्याने जे. एपस्टीन अँड कं. या नावाने स्वतःची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून जेफ्रि हा फक्त अब्जाधीश लोकांचे पैसे सांभाळत असे. किमान १ अब्ज डॉलर्स असणाऱ्या ग्राहकांसाठी तो काम करायचा.
२००५ मध्ये पाम बीच, फ्लोरिडा येथे त्याच्या पहिल्या केसची नोंद झाली. त्याने एका १४ वर्षे वयाच्या मुलीला सेक्ससाठी बोलावले. नंतर २००८ मध्ये त्याला दीड वर्षे कारावासाची सजा झाली. पण, दररोज त्याला जेलबाहेर बारा तास काम करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे तो फक्त १३ महिने तुरुंगात राहीला.त्यानंतर २०० हुन अधिक मुलींची तस्करी केल्याप्रकरणी त्याला २०१९ मध्ये एफबीआयने पुन्हा अटक केली.त्याची भागीदार घिसलेन मॅक्सवेलला २०२१ मध्ये २० वर्षाची सजा झाली. या काळात जेफ्रि याने मॅनहॅटनमध्ये ७७ मिलियन डॉलर्स कि.चे टाऊन हाऊस खरेदी केले. फ्लोरिडा व पॅरिसमध्ये अनेक घरे खरेदी केली. तसेच दोन प्रायव्हेट बेट खरेदी केली. ( लिटिल सेंट जेम्स ) त्याने खरेदी केलेल्या बोइंग ७२७ विमानाला लोक ” लोलिता एक्सप्रेस,असे म्हणायचे.त्यांच्या ब्लॅक बुक, प्रायव्हेट जेटच्या फ्लाईट लॉग आणि पैशाच्या व्यवहारात जगभरातील अनेक नेते, उद्योगपती आणि राजघराण्यातील व्यक्तींची नावे उघड झाली आहेत. या सर्व घडामोडीनंतर अमेरिकन काँग्रेसने १९ नोव्हे. २०२५ मध्ये एपिस्टन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट संमत केला. या कायद्याने अमेरिकेच्या न्यायप्राधिकरणाला आदेश दिला कि तुमच्याकडे असलेल्या एपस्टीनच्या सगळ्या फाईल्स १९ डिसें. २०२५ पर्यंत पब्लिक करा. त्यानंतर अमेरिकेच्या न्यायप्राधिकरणाने आतापर्यंत एकूण ३५ लाख पाने दिली, पण अजुन २५ लाख पाने गोपनीयतेचे कारण सांगून लपवून ठेवली आहेत. या यादीत अनेक प्रतिष्ठित राजकीय नेते व उद्योगपती यांची नांवे समाविष्ट आहेत.
क्रमशः

