दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
एपस्टीन फाईलच्या कागदपत्रानी अनेकांची झोप उडवली…
कालच्या भागात ” एपस्टीन फाईल, ” या लेखात जेफ्रि एपिस्टनची गुन्हेगारी वाटचालीवर प्रकाश टाकला. आज त्याच्या गुन्हेगारीचा सर्वाधिक फटका कोणकोणत्या देशाला बसला याविषयी आढावा घेणार आहोत. तसेच त्याच्या जाळयात किती उद्योगपती व राजकीय नेते अडकले ? यावर प्रकाश टाकणार आहोत.
एपस्टीन फाईलचा सर्वाधिक फटका युरोपला बसला. २००८ मध्ये जेफ्रि एपस्टीनला लैंगिक गुन्हा केल्या प्रकरणी शिक्षा झाल्यानंतरही एपस्टिनशी मैत्री ठेवल्यामुळे अनेक देशाचे नेते अडचणीत आले. आतापर्यंत १० देशात १५ हुन अधिक नेत्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
ब्रिटन –
१ ) प्रिन्स अँड्रयू राजा चार्ल्सचा भाऊ, १८ फेब्रु. २०२६ रोजी अटक, त्याचे लष्करी ‘किताब, प्रिन्स पद व विण्डसर मधील त्याचे आलिशान घर काढून घेण्यात आले.
२ ) पीटर मंडेलसन – माजी मंत्री आणि अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत, बिझीनेस सेक्रेटरी असताना ( २००८ – २०१० ) त्यांनी एपिस्टनला सरकारची गोपनीय दस्ताऐवज – टॅक्स पॉलिसी, सरकारी प्रॉपर्टी विक्रीची कागदपत्रे, त्याबदल्यात त्यांनी एपस्टिनकडून ७५ हजार डॉलर्स घेतल्याचे उघड, सप्टेंबर २०२५ मध्ये राजदूत पदावरून हकालपट्टी, फेब्रु. २०२६ मध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स व मजूर पक्षाचा राजीनामा, याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता. सध्या फौजदारी तपास सुरु आहे.
३ ) मॉर्गन मॅकस्विनी – ब्रिटनचे माजी पंतप्रधान केयर स्टार्मर यांचे चीफ ऑफ स्टाफ, फेब्रु. २०२६ मध्ये पंतप्रधान केयर स्टार्मर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला व त्यांना संसदेची माफी मागावी लागली.
नॉर्वे –
४ ) थोरबजॉर्न जगलँड,
माजी पंतप्रधान,नोबल कमिटीचे प्रमुख,ग्रॉस करप्शनचा आरोप,एपस्टीन कडून पैसा उकळण्यासाठी त्याच्या भ्रष्टाचाराचा तपास,
५ ) मोनाजुल व तर्जे रॉड – लार्सन,
ओस्लो शांतता कराराचे शिल्पकार,मोना जुल या जॉर्डनमधील माजी राजदूत होत्या.त्यांना राजीनामा द्यावा लागला.एपस्टीनशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे उघड,नॉर्वेच्या राजकुमारीला देशाची माफी मागावी लागली.
स्लोवाकिया –
६ ) मिरोस्लाव लाजॅक –
माजी परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ३०० हुन अधिक इमेलमध्ये ” जॉर्जीअस गर्ल्स, ” आणि राजकीय नेत्यांच्या भेटीचा उल्लेख त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
स्वीडन –
६ ) जोआना रुबीनस्टीन –
युएन अधिकारी, २०१२ मध्ये एपस्टीनच्या कॅरेबियन बेटाला भेट, त्यांनाही राजीनामा द्यावा लागला.
या एपिस्टन फाईलची हजारो पाने सार्वजनिक झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना राजीनामे द्यावे लागले. तर युरोपमधील सरकारे कोसळू लागली आहेत. या फाईलमध्ये आपल्या देशांतील राजकीय नेते व उद्योगपतीचीही नांवे आहेत. त्यामुळे सध्या विरोधक आक्रमक झाले असून त्यानी त्यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली आहे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लीन्टन, विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स व आपल्या नेत्यांची नांवे या फाईलमध्ये आहेत.त्याविषयी उद्याच्या तिसऱ्या भागात आपण पाहूया..
क्रमशः

