दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
नेहा बोरा ; एक अभ्यासू व आक्रमक नेतृत्व,
आज आपण एक अशा व्यक्तींची माहिती घेणार आहोत, जीने गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारला अनेक हादरे दिले. २९ वर्षाची ही तरुणी मूळची खटीमा, उधमसिंग नगर, उत्तराखंड येथे राहणारी, वडील भारतीय लष्कराच्या सेवेत, या तरुणीचे नांव आहे नेहा बोरा. नेहाचे बालपण विविध शहरामध्ये गेले.
त्या हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ,येथून समाजशास्त्राची पदवीधर झाली. तीचे पदव्युत्तर शिक्षण दिल्लीच्या डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात झाले. सध्या ती पी.एचडी करत आहे.त्यासाठी जेएनयूच्या स्कुल ऑफ आर्टस् अँड एस्थेटिक्स स्टडीजमध्ये संशोधन करत आहेत. दिल्लीच्या प्रसिद्ध पथनाट्य ग्रुप ” संगवारी, ” सोबत काम करते. त्यामुळे थियेटर कलाकार म्हणूनही तीची ओळख निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये आणलेल्या सीएए कायदा विरोधी आंदोलनात त्या सक्रिय झाल्या. नंतर डाव्या विचारसरणीच्या एआयएसए ( ऑल इंडिया स्टुडंट असो. ) या विद्यार्थी संघटनेच्या ( मार्क्स व लेनिनवादी पक्ष ) राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या. गेल्या महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. मतदारयादीच्या विशेष सधन पुनरिक्षण ( एसआयआर ) अनिमिततेचा आरोप करत त्यांनी सीजेपी सोबत जंतरमंतरवर आंदोलन केले.त्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. केंद्र सरकारने एसआयआरच्या नावाखाली १३ कोटी २० हजार मतदारांची नांवे यादीतून वगळली. एसआयआर हा कायदा तरुण मतदारांना वंचित ठेवणारा व लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचा सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्या आघाडीवर होत्या, त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या भाषणाची आक्रमक शैली व त्यांचा धाडसीपणा हा देशातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.

