Author: दीपक मोहिते

पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…

Read More

पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…

Read More

मुले होणार संगणक सुशिक्षित- आ. राजेश पाटील, पालघर, सर्वदा प्रतिष्ठान आणि नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवाडी आश्रम शाळेमधील १२ वी च्या विद्यार्थांसाठी मोफत एमएस-सीआयटी हा कोर्स मुलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवनीत फाउंडेशन हे आपल्या बेलवाडी आश्रमशाळेमध्ये १० उपलब्ध करणार असून सर्वदा प्रतिष्ठान अणि नवनीत फाऊंडेशन हे या केंद्राची संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे.मी देखील याच आश्रमशाळेचा विद्यार्थी होतो,आज मी आमदार झालो आहे, शिक्षणासाठी ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत,त्या सर्व मी उपलब्ध करुन देईन,असे आ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वदा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पटेल,नवनीत फाऊंडेशनचे वैभव चौहान, प्रणिता जाधव,वसई पंचायत समितीच्या…

Read More

सूर्या कालव्यांच्या होणार कायापालट, पाण्याची नासाडी थांबणार, डहाणू पूर्व, सूर्या कालव्यामधून ग्रामीण भागातील शेकडो गावांना उन्हाळ्यात रब्बी हंगामात पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र या कालव्यांची होणारी गळती लक्षात घेऊन सूर्या कालव्यांची नवीन आधुनिक पद्धतीने अस्तरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सूर्या प्रकल्पाचे कालवे दुरुस्ती अंतर्गत सूर्या उजवा मुख्य कालव्यावर ७ किमी अंतरावर थेरोंडापासून सोनाळे दरम्यान ही कामे करण्यात येणार आहेत. कोकणातील पाच जिल्हातील इतर कालव्यापैकी पहिल्यांदा पालघर जिल्ह्यात या मुख्य कालव्यावर डहाणू तालुक्यातील वाघाडी जवळ पेव्हर कॉक्रीटीकरण नवीन पद्धतीने काम करण्यात आले आहे. या ,७ कि.मी.लांबीच्या कामासाठी १९ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षात सूर्या कालव्यांची…

Read More

पालघर, औषध कंपनीला भिषण आग,कोणतीही जीवितहानी नाही, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सफायर लाईफ सायन्सेस औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीला आग लागली आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र या कंपनीच्या आजूबाजूला बांधकामे झाली असल्यामुळे आग विझवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते,ही आग कशामुळे लागली,हे देखील अद्याप समजू शकले नाही.

Read More

दीपक मोहिते, ” आम्हा जिल्हावासीयांच्या हालअपेष्टा,” दर पावसाळ्यात जिल्हावासीय भोगताहेत हालअपेष्टा, यंदाही पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यावासियाना सलग ३ ते ४ दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.सध्या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत:कोलमडून गेले आहे.या जलप्रलयामध्ये लोकांच्या मालमत्तेचे,राहत्या घरांचे कधीही भरुन न येणारे असे नुकसान झाले आहे.वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यानी जिल्ह्याचा दौरा करणे अपेक्षीत होते.विकासकामाचे उदघाटन व विविध इन्व्हेंटच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरे करणारे हे दोघेही जिल्ह्यात कुठेही फिरकले नाहीत.पण दरवर्षी अशी स्थिति का निर्माण होते,त्यामागची कारणे काय आहेत ? याबाबत त्यांनी साधी विचारपुसही केली नाही. निसर्गाच्या या अस्मानी संकटासमोर सर्व शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने जिल्हा व…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उंदरांच्या पळापळीला येणार वेग, राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा वाढता प्रभाव व त्यांच्या गटाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश,अशा दोन कारणांमुळे फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकूटाना घाम फुटला आहे.त्यामुळे त्यांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आता माघारी फिरू लागले आहेत.अजित पवार गटाचे पुण्यातील १५ ते २० खंदे पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शरद पवार यांचे बोट धरले.त्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शिंदे व अजित पवार गटाचे अनेक आमदारही ” सुबहका भुला, शामको घर लौटा,” अशा भूमिकेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पतन झाल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, आदिवासी समाज वनहक्क कायद्यापासून वंचित तर भूमाफिया व खदानमालक मात्र मालामाल, डोंगरदऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उपजीविकेसाठी सरकारने अनु.जमाती इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६,२००८ व २०१२ हा वनहक्क कायदा लागू केला.जंगलामध्ये वास्तव्य करून जमीन कसणाऱ्या आदिवासींना जमिनीचा हक्क देणाऱ्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी २००८ साली सुरू झाली.हा कायदा लागू करण्यामागे आदिवासी लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे,असा उदात्त हेतू होता.पण राज्यातील वनहक्क दाव्यांची प्रलंबित प्रकरणाची संख्या लक्षात घेता,हा कायदा प्रभावी ठरू शकला नाही,असेच म्हणावे लागेल.गेल्या पंधरा वर्षात सरकारने राज्यातील वन हक्काचे दावे त्वरित निकाली काढावे,यासाठी वेळोवेळी आदेश काढले,तरीही राज्यात लाखो दावे प्रलंबित आहेत.या प्रक्रियेमध्ये महसूल व वनविभागाकडून प्रचंड…

Read More

दीपक मोहिते, “न्यूजलाईन,” अजित पवार हे भाजपची सोबत कधीच सोडणार नाहीत, आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे.सुमारे साडेपाच हजार कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहतील,असा अंदाज भाजप नेते व्यक्त करत आहेत.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजर राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.बैठक नुकतीच सुरू झाली असून नितीन गडकरीसह अनेक नेते देखील पुण्यात दाखल झाले आहेत.भाजपने या विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून पुन्हा घमासान होण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे शिंदे व अजित पवार गटानेही प्रत्येकी १०० जागांवर दावा केला आहे.त्यामुळे महायुतीमध्ये नळावरचे भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपचे…

Read More

दीपक मोहिते, गुरुपौर्णिमा ; भारतीय संस्कृतीचे प्रतिक, भारतीय संस्कृती आणि परंपरेत गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष स्थान आहे. हा सण गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे,कारण ते आपल्याला ज्ञान,शिक्षण आणि जीवन जगण्याची कला शिकवतात.आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.महाभारत सारख्या महाकाव्याची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांचा हा जन्मदिवस असून तो या माध्यमातून साजरा करण्यात येत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचा सन्मान करतात.या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिष्य विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात, ज्यामध्ये पूजा,हवन आणि सत्संग यांना विशेष स्थान…

Read More