दीपक मोहिते,
मुख्यमंत्र्यांनी इतर रिसॉर्टसवरही बुलडोझर चालवावा,
- काल विरार पश्चिमेस नवापूर समुद्रकिनारी फिरायला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी मिलिंद मोरे यांच्या पदाधिकाऱ्याला किरकोळ भांडणातून मारहाण झाली.या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी २० ते २५ जणावर गुन्हे दाखल केले व पोलीस आता रीतसर कारवाई करत आहेत.
या सर्व घडामोडीनंतर अचानक घटनास्थळी अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले व त्यांनी ज्या रिसॉर्टससमोर हा प्रकार घडला,ते सेव्हन हिल्स रिसॉर्टस जमीनदोस्त केले.कारण मिलिंद मोरे याना मारहाण करणारे तरुण,या रिसॉर्टसचे कर्मचारी होते.मिलिंद मोरे यांचा मृत्यू हा दुर्देवी होता,यातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी,पण रिसॉर्टस जमीनदोस्त करणे,हे न्यायाला धरून नाही,जर ते अनधिकृत असल्यावरून जमीनदोस्त करण्यात आले असले तर त्या परिसरात सुमारे ५० ते ६० अनधिकृत रिसॉर्टस सुरू आहेत,ते रिसॉर्टस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणार का ? अर्नाळा,कळंब व नवापुर या समुद्रकिनारी असलेली शंभर ते दीडशे रिसॉर्टस ही अनधिकृत आहेत.या रिसॉर्टसमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाने स्थानिक रहिवाशी त्रस्त आहेत.या रिसॉर्टसमधील रुमसंस्कृतीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.आजवर या सर्व अनधिकृत रिसॉर्टस मध्ये शेकडो अपघात,हत्याच्या घटना घडल्या,पण कधीही पोलीस व महसूल विभागाने कारवाईचा बडगा उचलला नाही.या रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसाया विरोधात स्थानिकांनी अनेकदा आंदोलने व निदर्शने केली. पण या रिसॉर्टस मालकांच्या संघटनेवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई करण्यात येत नाही.या सर्व रिसॉर्टसमध्ये सर्रास दारू विकण्यात येत असते.पण शुल्क उत्पादक व पोलीस त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सागरी नियंत्रण कायदा धाब्यावर बसवत सरकारी गुरुचरण जमिनीवर उभारण्यात आलेली ही सर्व रिसॉर्टस जमीनदोस्त करून दाखवावीत,असे आवाहन या परिसरात राहणाऱ्या त्रस्त रहिवाशांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांना जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे ” बुलडोझर मुख्यमंत्री,” व्हायचे,असेल तर त्यांनी सर्वाना एकाच मापात मापायला हवे.

