भाजप व शिवसेनेची ( एकनाथ शिंदे गट ) लगीनघाई सुरू झाली,
पालघर,
पालघर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तर एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आपल्या पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमधील या दोन्ही घटकांनी निवडणुकीची लगबग सुरू केल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.या बैठकीस खा.डॉ.हेमंत सवरा,आ. निरंजन डावखरे,प्रभारी
राणी द्विवेदी,अभिजीत पेडणेकर,जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी व अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आखणी व अन्य बाबीवर आपली मते मांडली.तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकीच्या प्रचारसंदर्भात पक्षाची रणनिती कशी असेल,यावर सविस्तर विवेचन केले.यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली
मते मांडली.
दरम्यान महायुतीमधील शिवसेनेनेही ( एकनाथ शिंदे गट ) पालघर विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी व निरीक्षक नियुक्त केले आहेत.पालघर,डहाणू व बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून खा.नरेश म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.तर पालघर विधानसभा-पांडुरंग पाटील,डहाणू-सतीश महाडिक व बोईसर- हुंडारे,यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

