वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे गोविंदाना विम्याचे संरक्षण,
पालघर,
सालाबादप्रमाणे सामाजिक व धार्मिक उत्सव ” गोपाळकाला,” ( दहीहंडी ) मंगळ.२७ ऑगस्ट, २०२४ रोजी मनपा क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.तालुक्यातील अनेक गोविंदा पथके या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात.दहीहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदाना ( खेळाडू ) विम्याचे संरक्षण मिळावे,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येतो.यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली आहे.गोविंदा अपघात विमा योजनेचा अर्ज महानगरपालिकेच्या vvcmc.in या वेबसाईट वर उपलब्ध असून विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका,नवीन प्रशासकीय इमारत,क्रीडा विभाग,चौथा मजला, यशवंत नगर रोड,विरार ( पश्चिम ) येथे संपर्क साधावा.या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख शुक्र.१६ ऑगस्ट,२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.तरी महानगरपालिका हद्दीतील सर्व गोविंदा पथकांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून पथकात समाविष्ट गोपाळांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

