पालघर,
नालासोपारा येथे आधुनिक काळातील लखोबा लोखंडे गजाआड,
२५ हुन अधिक महिलांशी लग्न करून त्यांना लाखो रु.ना लुबाडणाऱ्या आधुनिक काळातील लखोबा लोखंडेला नालासोपारा पोलिसांनी गजाआड केले आहे.
शादी डॉटकॉम या वेबसाईटवरून फिरोज नियाझ शेख हा इसम महिलांशी ओळख करून लग्न करायचा.नुकतेच त्याने नालासोपारा भागातील एका महिलेशी लग्न केले व त्या महिलेकडून लॅपटॉप व अन्य वस्तू विकत घेण्यासाठी साडेसहा लाख रु.उकळले.पण आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून फिरोझला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली.या चौकशीत फिरोजने २५ हुन अधिक महिलांची अशीच फसवणूक केल्याचे उघडकीस आले.त्यामुळे पोलीस आता सर्व प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.फिरोज याने या महिलांना लाखो रु.चा गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.

