Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” यांना बहीण-भावाचं नातंच कळले नाही, काल महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला.या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.हा मेळावा १०० % यशस्वी झाला.या मेळाव्यात वक्त्यांनी केलेली भाषणे अप्रतिम अशी होती.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खा.सुप्रिया सुळे यांनी केलेली भाषणे तर इतिहासात नोंद करण्याजोगी होती.त्यांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला.महाविकास आघाडीची एकजूट ही महायुतीच्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार याचे संकेत या मेळाव्यातून मिळाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने मेळाव्याला सुरुवात झाली.ते आपल्या भाषणात म्हणाले,दिल्लीतून येणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र कदापी लुटू देणार नाही.लोकसभा निवडणुकीत आपण त्यांना धूळ चारली,विधानसभा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नबाब मलिक अजित पवार गटातच, महायुती अडचणीत येणार, काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) कोअर कमिटीची बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकीला वादग्रस्त नेते नबाब मलिक आवर्जून उपस्थित होते.ते बैठक संपल्यानंतर रात्री उशिरा दीड वाजता अजित पवार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.त्यामुळे नबाब मलिक हे अजित पवार गटातच आहेत,यावर एकप्रकारे शिक्केमोर्तब झाले आहे. कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना समवेत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांना जेलची हवा खावी लागली होती.कालांतराने त्यांना प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाला.जेलच्या बाहेर येताच ते अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, ” ही भयाण शांतता कुठवर ? आपल्या शेजारी असलेला बांगला देश व पाकिस्तान या दोन देशात ज्या राजकीय उलथापालथी घडत आहेत.त्यासंदर्भात आपल्या सरकारने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद याना पदच्युत होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला.त्यानंतर त्या देशात हिंदूंचे मोठ्याप्रमाणात शिरकाण झाले.त्याप्रकरणी मोदी सरकारने इतर देशाशी सल्लामसलत करून बांगला देशाचे काळजीवाहू सरकार व लष्करावर दबाव निर्माण करायला हवा होता.पण सरकारने अद्याप ठोस अशी भूमिका स्पष्ट केली नाही. शेख हसीना वाजेद यांना भारतात आश्रय दिल्यामुळे बांगला देशातील अनेक जातीयवादी संघटनांनी भारताचा निषेध केला आहे.जमाते इस्लामी या जहाल विचारसरणीच्या संघटनेने तर शेख हसीना जावेद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार,पुन्हा तिसरी घोडचूक करण्याच्या तयारीत… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपले चिरंजीव जय पवार यांना उभे करण्याचे संकेत दिले आहेत.अजित पवार हे पुन्हा घोडचूक करत आहेत,एकतर त्यांनी स्वतः उभं राहावं,किंवा जिल्ह्यातील एखाद्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांला उमेदवारी द्यावी,अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत मुलगा पार्थ पवार व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपली पत्नी सुनेत्रा पवार उभं करून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता.यातून शहाणे न होता त्यांनी पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार याला उभे करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे काकाश्री,लाडकी बहीण व पुतण्या त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी जंग जंग…

Read More

दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” वसई विधानसभा मतदारसंघ, आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात… वसई विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात नसणार,या एकमेव कारणामुळे विविध पक्षाच्या अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.२०१९ मध्ये सलग सहाव्यांदा निवडून आलेल्या आ.ठाकूर यांनी २०२४ ची निवडणूक मी लढवणार नाही,असे जाहीर केले होते.त्यामुळे यंदा वसई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली.पण आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात उतरतील,असे संकेत मिळू लागल्यामुळे सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी मायूसी निर्माण झाली आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आपली डाळ शिजू शकणार नाही, हे माहीत असल्यामुळे हे इच्छुक उमेदवार,यावेळी बविआचा उमेदवार कोण असेल,याविषयी कानोसा घेऊ लागले आहेत. आ.ठाकूर यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय…

Read More

दीपक मोहिते, जाज्वल्य देशाभिमानच देशाला महासत्ता बनवू शकतो… आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.स्वातंत्र्याच्या साडेसात दशकात आपल्या देशाची झालेली वाटचाल वाखणण्याजोगी आहे.सुरुवातीच्या काळात अनेक आघाडीवर बलाढ्य देशानी आपली कोंडी केली.अन्न-धान्य,संरक्षण,परराष्ट्र धोरण,शिक्षण,आरोग्य व आर्थिक धोरण इ.क्षेत्रात आपण मागासलेलो होतो.परंतु आता तशी स्थिती राहिली नाही.वरील सर्व क्षेत्रात आपण स्वंयपूर्ण झालो आहोत,ही अभिमानाची बाब असून प्रत्येक भारतीयाने आज आपल्या तिरंग्याला सलाम करायलाच हवा.अठरापगड़ जाती-जमाती,विविध भाषा व संस्कृती,प्रचंड लोकसंख्या असलेला लोकशाहीप्रधान देश,अशी जगभरात आपली ओळख आहे.हे सारे एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवण्याची किमया आपल्या राज्यकर्त्यानी यशस्वीरित्या करून दाखवली,याची नोंद आपण सर्वांनी घ्यायलाच हवी. गेल्या ७७ वर्षात देश विकसनशील देशाच्या रांगेत सामील झाला,जगभरात आता…

Read More

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.४ फ्रंटलाईन, त्यामुळे मालदीव ताळ्यावर आला… मालदीव हा देश जमिनी क्षेत्रानुसार सर्वात लहान असा देश असून तो मुस्लिमबहुल आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेमध्ये या देशाची लोकसंख्या पाच लाख पंधरा हजार इतकी असल्याचे स्पष्ट झाले.तो भारताच्या नैऋत्येस ६०० कि.मी.अंतरावर लक्षद्वीप समूहाजवळ २६ बेटांवर वसलेला आहे.माले ही त्याची राजधानी आहे.देशाचे वार्षिक सकल उत्पन्न हे २.८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.हा देश अनेक वर्षे ब्रिटनच्या ताब्यात होता.२६ जुलै १९६५ मध्ये तो स्वतंत्र झाला.या देशाशी भारताचे अत्यंत चांगले व सौहार्दाचे संबंध आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे.गेल्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रपती मोहंमद मुइज्जू यांनी भारताने आपल्या देशातील सैन्याला…

Read More

दिपक मोहिते, फ्रंटलाईन, मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दोन नवीन मार्ग प्रस्तावित, सुमारे २६ हजार कोटी रु.खर्च अपेक्षित, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास अधिक सुखद व तो कमी वेळेत व्हावा,यासाठी मध्य रेल्वे दोन नवीन प्रकल्प हाती घेत आहे.कर्जत-तळेगाव व कर्जत-कामशेत असे हे दोन नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहेत.या प्रस्तावित मार्गावर घाट नसल्यामुळे पुण्याला अवघ्या दोन ते अडीच तासात जाणे शक्य होणार आहे. मुंबई-पुणे १९२ कि.मी. अंतर पार करायला साध्य तीन तास लागतात.कर्जत-लोणावळा या दरम्यान घाट असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी असतो.पण घाट टाळून होणारे हे दोन मार्ग सुरू झाल्यास गाड्या ११० की.मी.वेगाने धावतील व प्रवाशांना कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.त्यासाठी मध्य रेल्वेने दोन मार्गाचे…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक वार्तापत्र, उमेदवारीसाठी,” पळा,कोण पुढे पळे तो,” शर्यत सुरू, राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला माफक प्रमाणात यश मिळाले असले तरी पालघर जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व अत्यंत नगण्य असे आहे.पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय असली तरी त्यांच्या इच्छुक उमेदवारामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मॅरेथॉन शर्यत सुरू झाली आहे.साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवू न शकणारे काही स्वयंभू नेतेही या शर्यतीत सामील झाले आहेत. १९९५ साली आ.हितेंद्र ठाकूर काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर या पक्षाची अक्षरशः वाताहत होत गेली.त्याकाळी पक्षाला उभारी देणारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही आ.हितेंद्र ठाकूर सोबत पक्षाला सोडचिट्ठी दिली.त्यानंतर काँग्रेसला काही किरकोळ अपवाद वगळता एकही निवडणूक लढवणे शक्य झाले नाही.गेल्या तीस वर्षात झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जे पोटात होते,ते ओठावर आले, रक्षाबंधनाच्या तोंडावर भाजपचे आ.रवी राणा व शिवसेनेचे ( शिंदे गट ) आ.महेश शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ” लाडक्या बहिणीं,” ना थेट धमक्या दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची सारवासारव करताना झालेली दमछाक उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर काल जळगाव येथे जाहीर सभेत बेंबीच्या देठापासून कोकलत होते.या दोघा आमदारांनी गमतीने हे वक्तव्य केले असल्याचे ते ” खोटं बोल,पण रेटून बोल,” या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलत होते. आ.राणा काय म्हणाले पाहूया,” जर तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात तर या १५०० रु.चे ३००० रु.होतील.पण जर का तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर मी तुमचा…

Read More