शाम पुरोहित,पालघर,
मोखाडा ग्रामस्थांची पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयास भेट,
मोखाडा तालुक्यातील चार ते पाच अतिदुर्गम गावातील गावातील ग्रामस्थानी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय पाहण्यासाठी भेट दिली.
शिवछत्रपती पाडा समिती सप्रेवाडी आणि परिवर्तन पाडा समिती बेडूकपाडा यांच्यातर्फे ग्रामस्थांसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यालयातील कार्यालये कशा स्वरूपाची आहेत, तसेच या कार्यालयातील कारभार कसा चालतो,हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी या ग्रामस्थांनी ही भेट दिली.यावेळी प्रत्येक कार्यालयात त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बसून गावकऱ्यांनी अध्यक्ष निकम यांच्या सोबत संवाद साधलाआणि विविध प्रश्नांवर चर्चा केली.
पहिल्यांदाच मुख्यालयाची इमारत आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांची दालने पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल समितीच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी अध्यक्ष प्रकाश निकम यांचे आभार मानले.

