शाम पुरोहित,पालघर,
भाजप ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न,
सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.नोव्हें किंवा डिसें. मध्ये येणाऱ्या निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक श्री. विजय भाऊ चौधरी महामंत्री,भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेश, आ.योगेश टिळेकर व संजय गाते ( प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश,ओबीसी मोर्चा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मायक्रो ओबीसी घटकांची बैठक व बूथस्तरापर्यंत ओबीसी कार्यकर्त्यांचा प्रवास, विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी मोर्चाची भूमिका याविषयी विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
सदर बैठकीला ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,विनोद दळवी, वनिता लोंढे, उपाध्यक्ष भारद्वाज चौधरी,अजित खरात, राजेश कांगणे,सचिव प्रशांत पाटील,कोकण संपर्कप्रमुख संजोग यंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

