प्रमोद डुंबरे,नालासोपारा,
नालासोपारा पूर्वेस पेल्हार येथे महाविकास आघाडीची मूक निदर्शने,
असंवेदनशील, मुके,बहिरे,महिलांवरील होणारे अत्याचार रोखू न शकणारे आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारे महाराष्ट्राच्या महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) आणि शिवसेना ( उबाठा ) या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले.हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशप्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पेल्हार हायवेवर काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे अभिजित घाग,अम्मार पटेल,निझाम खान,आनंद चौबे,अशोक शर्मा,रितेश सोलंकी,संदीप किणी, संकेत वसईकर,आमिर देशमुख,तारिक खान,देवा तरे,जमील देशमुख, इब्राहिम बकाई,मुस्तफा इसाभाई पटेल,अब्दुल रेहमान,अरफात शेख, सज्जाद अन्सारी,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख,समर खान तसेच शिवसेना ( उबाठा ) चे वालीव शाखाप्रमुख जगदीश धनगर,राधेश्याम पाठक आणि अनेक महिला त्याचप्रमाणे मौलाना जमील हाश्मी,मौलाना जिया उल हक,पेल्हारमधील सादिक खान, अकबर भाई, युनूस मलकानी,शोएब खान आणि तिन्ही पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पेल्हार पोलीसानी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

