अनिल वैद्य,नाशिक,
ताणतणावाच्या वातावरणातही मुख्यमंत्री शिंदे निसर्गाच्या सानिध्यात रमले,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाचे दर्शन आज नाशिककराना घडले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिक येथे लाडकी बहीण मेळाव्याच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते.नाशिक जवळच असलेल्या ओझर विमानतळाजवळ असणाऱ्या वनराईमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराच्या हालचालीने त्यांचे लक्ष वेधले.आकाराने खूप मोठा असणारा मोर विमानतळाच्या कंपाऊंड लागत असलेल्या डीपीच्या बॉक्सवर बसला होता.या परिसरात मोर आणि अन्य वन्यजीवांचे मोठ्याप्रमाणावर वास्तव्य आहे.सतत राजकीय वातावरणात आणि ताणतणावात काम करत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष त्या मोरावर गेले.त्यांच्यातील निसर्गप्रेमी संवेदनशील माणूस जागृत झाला आणि त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या मोराचा फोटो आणि व्हिडिओ शूट केला.विमानापासून काही अंतरावर पुढे जात त्यांनी सुरक्षित अंतरावरून या मोराचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

