शिरीष भोईर,चारोटी/कासा
चारोटी येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन ; वाहतूक दोन तास ठप्प,
आज सकाळी अकरा वाजता डीवायएफवाय व विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येवून चारोटी नाका येथे रास्ता रोको केले.
पेसा कायद्यांतर्गत थांबवण्यात आलेली भरती,पेसा क्षेत्रातील वनजमिनीच्या कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी करणे,आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती लाभार्थ्यांना देणे व आदिवासींच्या हक्काच्या जागांवर असलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करणे,इ.मागण्यासाठी मार्क्स.कम्यु.राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व अन्य संघटनांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.यावेळी रस्त्यावर हजारो आदिवासी उतरले,त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली.त्यामुळे मुंबई व सुरतच्या दिशेची वाहतूक ठप्प झाली होती.
अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्ग पेसा पद भरती व्हावी,यासाठी नाशिक येथे गेल्या २० दिवसापासून आंदोलन सुरू आहे,पण त्या आंदोलनाची राज्य शासन दखल घेत नसल्यामुळे आज आदिवासी संघटनांनी एकत्र येवून एल्गार पुकारला होता.हे आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते.

