Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, “न्यूजलाईन,” अजित पवार हे भाजपची सोबत कधीच सोडणार नाहीत, आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे.सुमारे साडेपाच हजार कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहतील,असा अंदाज भाजप नेते व्यक्त करत आहेत.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजर राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.बैठक नुकतीच सुरू झाली असून नितीन गडकरीसह अनेक नेते देखील पुण्यात दाखल झाले आहेत.भाजपने या विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून पुन्हा घमासान होण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे शिंदे व अजित पवार गटानेही प्रत्येकी १०० जागांवर दावा केला आहे.त्यामुळे महायुतीमध्ये नळावरचे भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपचे…

Read More

दीपक मोहिते, गुरुपौर्णिमा ; भारतीय संस्कृतीचे प्रतिक, भारतीय संस्कृती आणि परंपरेत गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष स्थान आहे. हा सण गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे,कारण ते आपल्याला ज्ञान,शिक्षण आणि जीवन जगण्याची कला शिकवतात.आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.महाभारत सारख्या महाकाव्याची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांचा हा जन्मदिवस असून तो या माध्यमातून साजरा करण्यात येत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचा सन्मान करतात.या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिष्य विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात, ज्यामध्ये पूजा,हवन आणि सत्संग यांना विशेष स्थान…

Read More

दीपक मोहिते, इन्व्हेंटच्या धुंदीत रमलेले सरकार,आता शुन्य ते तीस पटाच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.एकीकडे शिक्षण हक्क कायद्यावर भरभरुन बोलायचे तर दुसरीकडे व्यवस्थेवर घाला घालायचा, हे गेली अनेक वर्षे सुरु आहे.४ ते ५ विद्यार्थी असलेल्या या शाळा बंद करुन नजिक असलेल्या दुसऱ्या शाळेत या विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचे,अशी ही योजना आहे.त्याचे भविष्यात दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याला छेद देणारा आहे.या कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरापासून तीन कि.मी.च्या शिक्षणाची व्यवस्था असायला हवी,शासनाच्या या निर्णयामुळे या कायद्याची पायमल्ली होणार आहे.ग्रामीण भागातील शिक्षणाची वाताहात शासनाच्या दिशाहीन धोरणामुळे…

Read More

दीपक मोहिते, केंद्र सरकारने मत्स्यव्यवसायाची भरभराट व्हावी,तसेच मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीमध्ये आमूलाग्र बदल व्हावा,यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना कार्यान्वित केली आहे.या योजनेंतर्गत वसई तालुक्यातील अर्नाळा या मच्छिमार गावाची निवड करण्यात आली आहे. या गावासाठी आराखडा तयार करण्यासाठी काल पालघर येथील सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मत्सव्यवसाय आयुक्तांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी विविध मच्छिमार सह.संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य व अधिकारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात वसई,पालघर व डहाणू तालुक्याला सुमारे ११२ की.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.अर्नाळा,वसई पाचूबंदर,सातपाटी,नवापूर,मुरबे,वडराई,डहाणू व धाकटी डहाणू या गावातील हजारो मच्छिमार कुटंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवतात.पण गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाची विविध कारणांमुळे पीछेहाट…

Read More

दीपक मोहिते सलग चौथ्या दिवशी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे जिल्ह्याचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी रस्ते पाण्यात गेल्यामुळे वाहने हळुवारपणे चालवावी लागत होती. काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दिवसभर सुरूच होता.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.राष्ट्रीय महामार्गावर चिखल,बांधकाम साहित्य व पाणी,अशा तिहेरी संकटाचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे.अनेक ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या.पहाटे पावसाचा जोर वाढल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप झाला.तसेच या पावसाचा रेल्वेवरही परिणाम झाला,उपनगरीय रेल्वेसेवा अत्यंत धिम्यागतीने सुरू होती.लोकल्स देखील उशिराने धावत होत्या.तसेच पश्चिमेस समुद्रात दिवसभर प्रचंड लाटा उसळत होत्या.समुद्रातील वादळी वातावरण व वेगाने वाहणारे वारे,लक्षात घेऊन समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा…

Read More

दीपक मोहिते, २० जुलै रोजी १९६९ रोजी अमेरिकेच्या निल आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहीले पहिले पाऊल ठेवले.या घटनेला आज ५५ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतरच्या काळात अनेक प्रगत देशांनी चंद्रमोहिमा राबवल्या.आपल्या नासानेही चंद्रावर रोव्हर उतरवले.या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या अंतरंगाचे जगाला दर्शन झाले.कोट्यवधी मैलावरून चंद्र शीतल असल्याचे आपापल्या वाटत असले तरी तो तसा नाही.प्रत्यक्षात तो लाव्हारसाने बनलेला एक खडक आहे.चंद्रावर असलेल्या वातावरणावर हजारो संशोधने झाली.चंद्र हा ना तारा आहे ना ग्रह,तो परप्रकाशित असून त्याच्यावर गुरुत्वाकर्षण फार कमी आहे.तो दिसायला सुंदर व विलोभनीय असला तरी मूळतः तसा नाही.अनेक अविकसित देशही चांद्रमोहिमा राबवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Read More

दीपक मोहिते वसई विरार मनपाच्या प्रभाग समिती ‘एफ’ धानीव/पेल्हार अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती’ एफ’ धानीव/पेल्हार अंतर्गत पेल्हार येथील मलिक वजन काटा सोपाराफाटा येथे अंदाजे ३ हजार चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत गाळ्याचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.तसेच, पेल्हार जाबरपाडा येथील अंदाजे २ हजार चौ.फुट अनधिकृत गाळा निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे.सदर कारवाई वेळी प्रभाग समिती ‘एफ’ चे प्र.सहा. आयुक्त व इतर अधिकारी,पोलीस व एमएसएफ कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.सदर मोहिमेत एकूण ५ हजार चौ.फुटाचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात येत आहे.अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे.

Read More

दीपक मोहिते पालघर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न,समस्या सुटत नसल्यामुळे काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.त्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत बैठक तहकूब केली.या बैठकीनंतर शरद पवार गटाचे आ.सुनिल भुसारा यांनी पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा थेट आरोप केला. काल झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी अहवाल पूर्ण केला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित अधिकाऱ्यांवर भडकले.मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.आ.सुनिल भुसारा यांनी अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करत थेट पालकमंत्र्यांनाच लक्ष्य केले.अधिकारीवर्गाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील रस्त्यांची…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पक्षनिधी गोळा करण्यास आयोगाची संमती,ठाकरे व पवार गटात उत्साहाचे वातावरण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ( उबाठा ) मोठा दिलासा मिळाला आहे.आयोगाने त्यांना पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली आहे.आयोगाच्या या निर्णयामुळे पक्षात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी आयोगाने शरद पवार गटालाही पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली होती.आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार हे आता पक्षाचे नाव व चिन्ह परत मिळावे,यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या पक्षांनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.त्याचा निकालही आपल्या बाजूने लागेल,अशी त्यांना खात्री वाटत आहे. पक्ष फोडणे,आमदार पळवणे व अन्य अनिष्ट बाबींना हवा देत भाजपने राज्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” कॅगने राज्य सरकारची लक्तरे वेशीला टांगली,” सवंग लोकप्रियता व पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सार्वजनिक पैश्याची सध्या जी उधळपट्टी चालवली आहे,ती भविष्यात राज्याला त्रासदायक ठरणारी आहे.या अशा उधळपट्टीमुळे राज्यावर सध्या ८ लाख कोटी रु.कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.यावर भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी ( कॅग ) आपल्या अहवालात या उधळपट्टीवर कडक ताशेरे ओढले आहेत. राज्यात एकूण शंभरहून अधिक उपक्रम,महामंडळे व संस्था आहेत,त्यापैकी ४० ते ५० महामंडळाचा तोटा ५५ हजार कोटी रु.वर गेला आहे.एसटी महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतनही देऊ शकत नाही,तर गर्भश्रीमंत अशी ओळख असलेले मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणही आता कर्जात आखंड बुडाला आहे.या सर्व…

Read More