दीपक मोहिते
वसई विरार मनपाच्या प्रभाग समिती ‘एफ’ धानीव/पेल्हार अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती’ एफ’ धानीव/पेल्हार अंतर्गत पेल्हार येथील मलिक वजन काटा सोपाराफाटा येथे अंदाजे ३ हजार चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत गाळ्याचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.तसेच, पेल्हार जाबरपाडा येथील अंदाजे २ हजार चौ.फुट अनधिकृत गाळा निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे.सदर कारवाई वेळी प्रभाग समिती ‘एफ’ चे प्र.सहा. आयुक्त व इतर अधिकारी,पोलीस व एमएसएफ कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.सदर मोहिमेत एकूण ५ हजार चौ.फुटाचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात येत आहे.अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे.

