दीपक मोहिते
सलग चौथ्या दिवशी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे जिल्ह्याचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी रस्ते पाण्यात गेल्यामुळे वाहने हळुवारपणे चालवावी लागत होती.
काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दिवसभर सुरूच होता.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.राष्ट्रीय महामार्गावर चिखल,बांधकाम साहित्य व पाणी,अशा तिहेरी संकटाचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे.अनेक ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या.पहाटे पावसाचा जोर वाढल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप झाला.तसेच या पावसाचा रेल्वेवरही परिणाम झाला,उपनगरीय रेल्वेसेवा अत्यंत धिम्यागतीने सुरू होती.लोकल्स देखील उशिराने धावत होत्या.तसेच पश्चिमेस समुद्रात दिवसभर प्रचंड लाटा उसळत होत्या.समुद्रातील वादळी वातावरण व वेगाने वाहणारे वारे,लक्षात घेऊन समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.सूर्या,वैतरणा,तानसा,पिंजाळ व देहर्जे या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी त्यांनी अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नाही.आणखी काही दिवस असाच सलग पाऊस झाल्यास धरणाचे दरवाजे उघडले जातील,अशी शक्यता आहे.तूर्तास तशी स्थिती नाही,पण गेल्या चार दिवसापासून पावसाचे रौद्र रूप पाहता,जिल्हावासीयांना सतर्क राहावे,लागणार आहे.जिल्हा प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
	Trending
	
				- आयाराम गयारामचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,

 
									 
					

