Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, दशक उलटल्यानंतरही पालघर जिल्हा कुपोषितच… दहा वर्षापुर्वी पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आला.जिल्हा यंत्रणेची गाडी काही अंशी रुळावर आली असली तरी जिल्ह्याने अद्याप बाळसं धरलेले नाही.यंत्रणा पूर्ण क्षमतेने आजही कार्यान्वित झालेली नाही. राज्यातील महायुतीच्या सरकारचे हे फार मोठे अपयश आहे.या जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याला निधीची कमतरता नाही.पण राज्यकर्ते पक्षाच्या प्रसिद्धीसाठी जी वारेमाप उधळपट्टी करत आहेत, त्यामुळे आज पाणी,आरोग्य, शिक्षण व वैद्यकीय सेवा क्षेत्रात भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.दहा वर्षाचा कालावधी हा कमी नाही.या काळात प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्याची गरज होती. आज जिल्ह्यातील शेतकरी,आदिवासी व स्थानिक भूमिपुत्र विविध समस्यांनी त्रस्त आहेत.रस्ते,पाणी,दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय…

Read More

दीपक मोहिते, वेळीच सावध व्हा,अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ, राज्यात यंदा पाऊस मुबलक प्रमाणात झाला असून पिण्याचे,शेतीसिंचन व उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे पाणी,किमान ७ महिने पुरेल इतका जलसाठा राज्यात उपलब्ध झाला आहे.काही ठराविक जिल्ह्यात ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीनुसार यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.आपले सारे जीवन हे पावसाळी पाणी व भूगर्भातील जलसाठा,यावर अवलंबून आहे.पावसाचे प्रमाण सतत कमी होणे व भूगर्भातील पाण्याची पातळीमध्ये सतत होणारी घसरण,इ.कारणांमुळे जगभरातील अनेक देश सध्या चिंतेत सापडले आहेत.येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करेल व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल.आज देशभरातील अनेक देश पाणीटंचाईत होरपळत आहेत.आफ्रिका खंडातील काही देश पाण्यावाचून तडफडत आहेत.वाढती…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सौहार्दाचे वातावरण बिघडत चालले आहे, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी व मराठा,या दोन समाजात जे काही रणकंदन माजले आहे,त्यास शरद पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत ठरले आहे.राज्यातील या दोन प्रमुख समाजाला एकमेकाविरोधात उभे करण्याचे पाप या दोघांनी केले आहे.त्यामुळे एरव्ही शांत असलेले हे दोन्ही समाज आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.समाज विस्कळीत करण्याचे पाप या दोघांकडून झाल्याचे अनेक पुरावे हाती आले आहेत. १९९४ साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या शरद पवार यांनी काढलेल्या एका जीआर मुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला.त्यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही,असे वारंवार सांगत असत,आज तेच पवार,आरक्षण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोविड १९ पेक्षा ” इनकमिंग,” या व्हायरसचा वेगाने फैलाव, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर ” इनकमिंग,” या व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने सुरू झाला आहे.जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे तरी या व्हायरसने बाधित झालेले रुग्ण आढळत आहेत.हा व्हायरस,कोविड १९ च्या व्हायरसपेक्षा अत्यंत धोकादायक असून तो तुमच्या मुलाबाळांचे भवितव्य उध्वस्त करणारा आहे.दिवसागणिक पसरत चाललेल्या व्हायरसला रोखणारी लस देखील भविष्यात सापडू शकणार नाही.कोविड १९ चा आपण नायनाट करू शकलो,पण हा व्हायरस संपूर्ण तरुण पिढीला गिळंकृत करणारा आहे.हा व्हायरस हा तुमच्या सदसदविवेकबुद्धीवर हल्ले करतो.तुमची विचारसरणी कुंठित करतो,त्यामुळे हा व्हायरस,कोविड १९ पेक्षा अत्यंत घातक असा आहे. असो,गेल्या काही दिवसांपासून सर्वच…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्ष उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल नाही ; ” ये रे माझ्या मागल्या,” सुरूच, लोकसभा निवडणुका होऊन आता सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २४ नोव्हे.२०२४ रोजी लागला.या वर्षभराच्या काळात लोकांच्या आशा – अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या का ? त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न मार्गी लागले का ? त्यांना दिलासा मिळाला का ? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.नव्याने निवडून आलेले खासदार व आमदार यांचे सध्या केवळ इव्हेंटस सुरू आहेत. डहाणूचे आ.कॉ.विनोद निकोले व विक्रमगडचे हरिश्चंद्र भोये हे दोन आमदार वगळता…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाड्यातील नागरिकांची स्वदेशी पणत्यांना पहिली पसंती दिवाळी हा सण गेल्या सोम.पासून सुरु झाला आहे.दिवाळीच्या सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून दिवाळी हा सण प्रकाशाचा व तेजाचा सण समजला जातो. प्रथा-परंपरेनुसार वसूबारस ते भाऊबीजेपर्य॔त दिवाळी सण साजरा होत असतो.या दरम्यान प्रत्येक घरात पणत्या लावून आवर्जून रोषणाई केली जाते.दिवाळी सणानिमित्ताने कुडूस बाजारपेठेत पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या असून नागरिकांनी खरेदी करत असतांना स्वदेशी पणत्यांनाच पसंती दिली आहे. सध्याच्या युगात वीजेवर चालणारी इतकी साधने असतांनाही दिवाळीत आपण पणत्या आवर्जून लावत असतो.कारण विजेच्या दिव्यात आपल्या तेजाने दुस-या दिव्याला प्रकाशित करण्याची शक्ती नाही.जी सामान्य पणतीच्या ज्योतीत आहे.एका पणतीची ज्योत हव्या तितक्या इतर पणत्यांना प्रकाशित…

Read More

जव्हार प्रतिनिधी, दिवाळी फराळ व घरगुती साहित्य विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार तालुक्यातील ग्रामीण महिला स्वावलंबनाचा सुगंध पसरवत आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि पंचायत समिती जव्हार तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी पंचायत समिती आवारात आकर्षक ” दिवाळी महोत्सव स्टॉल प्रदर्शन,” भरवले आहे.या ठिकाणी जव्हार तालुक्यातील एकूण १० महिला बचत गट सहभागी झाले असून,पारंपरिक दिवाळी फराळ,बांबू,आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या,सुगंधित अगरबत्ती,रांगोळी,झाडू, साड्या,तोरण अशा अनेक घरगुती व उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.या सर्व वस्तू महिलांनी घरगुती पद्धतीने प्रेमाने तयार केल्या असून,त्यांच्या दर्जेदार व पारंपरिक स्वादामुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्यावतीने…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास आघाडी सोबत जाणे,बहुजन विकास आघाडीला परवडणारे नाही, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष बहुजन विकास आघाडीला सोबत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.अशाप्रकारचा निर्णय झाल्यास त्यातून काय व कशाप्रकारचे आउटपुट मिळेल,हे आजच्या घडीला सांगता येणार नाही.पण असा निर्णय झाल्यास बहुजन विकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता मात्र अधिक आहे. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आ.हितेंद्र ठाकूर या दोघांचे एकमेकांशी किती सख्य आहे,हे जगजाहीर आहे.अशा परिस्थितीत त्यांची होणारी आघाडी या निवडणुकीत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य निवडणूक आयोगाची बैठक ; काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजलं असून सारे राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.मतदारयादीतील गैरप्रकार प्रकरणी निवडणूक आयोग सध्या अडचणीत आले आहे.विरोधी पक्षाने या प्रश्नी दाखवलेली एकजूट ही प्रशंसनीय ठरली आहे.स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच निवडणूक आयोगाच्या कारभारावर काळे ढग जमल्याचे पाहायला मिळाले.विरोधकांच्या रेट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला नमते घेत काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घ्यावी लागली.या बैठकीत काही प्रमुख नेत्यानी मतदारयादीतील अनेक गैरप्रकाराकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.पण या बैठकीतून चांगले काही निष्पन्न होईल,असे वाटत नाही. एकेकाळी तत्कालीन निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांनी आपल्या निष्पक्ष कारभाराने जगाचे लक्ष वेधून घेतले होते,तोच…

Read More

तलासरी प्रतिनिधी, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी – प्रा.डॉ.राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचालित,कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय व माहितीशास्र विभागाअंतर्गत, भारतरत्न माजी राष्ट्रपती.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ” वाचन प्रेरणा दिन, ” म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्व कळावे,या हेतूने दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.त्यासाठी आज येथे या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी आपल्या मनोगतात अतिशय प्रतिकूल परीस्थितीत स्वप्नांचा पाठलाग करत ध्येय कसे गाठावे,यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय.त्यांनी यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश…

Read More