- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आर्थिक निधी वळवणे ; दलित व आदिवासी आमदारांनी एकत्र येऊन अजित पवार यांच्या मनमानी कारभाराला चाप लावावा… राज्यात गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ” लाडकी बहीण योजना,” अंमलात आणली.त्याचे दृश्यपरिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.समस्त महिलावर्गाने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात भरभरून मते टाकली.त्यामुळे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला.निवडणुकीच्या प्रचारात गुलाबी कोट घालणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फार काळ हा कोट घालावा लागला नाही.सध्या ते पुन्हा सफेद कपड्यावर हिंडताना पाहायला मिळत आहेत. पण,आता या योजनेमुळे मंत्रिमंडळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.या योजनेसाठी लागणारा आर्थिक निधी कसा…
नदीम शेख,पालघर पालघर जिल्ह्यात खरीप हंगाम भातबियाणे वाटपाचा शुभारंभ, पालघर जिल्हा परिषद अंतर्गत खरीप हंगामासाठी भातबियाणे वाटपाचा शुभारंभ काल पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गटविकास अधिकारी ( प्र. ) बापुराव नाळे आणि कृषी विभागातील अधिकारी तसेच अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद पालघरच्या कृषी विभागातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत आहे.यावर्षीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून,जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती ( पालघर, डहाणू,तलासरी,विक्रमगड, जव्हार,मोखाडा,वसई,वाडा ) कार्यालयांमध्ये भातबियाणे पोहोचले…
संजय नेवे,विक्रमगड नुकसानग्रस्त गावांना जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली भेट, गेल्या दोन दिवसापूर्वी विक्रमगड तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे टेटवाळी – देहर्जे सवादे या भागात मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली.त्यामुळे भागात अनेक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांना भेटी दिल्या व परिस्थितीची पाहणी केली. तसेच साखरे येथे सुरू असलेल्या देहर्जे प्रकल्पाच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. त्यानंतर विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व म्हसेपाडा येथील गावानाही त्यांनी भेटी दिल्या.म्हसेपाडा येथे नदी असल्यामुळे त्या गावातील लोकांना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी योग्य ती सोय नाही.त्यामुळे जिल्हाधिका ऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीची देखील पाहणी…
जव्हार प्रतिनिधी, पिकाची नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी सुखावले, शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी दीर्घ व लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.याच प्रयत्नाचा भाग म्हणून खावडाचार पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारण्याचे काम पालघर जिल्ह्यात सध्या सुरू आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल २००० मेगा वॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे. उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली पारंपारिक शेती व्यवसाय करण्याची मुभा देण्यात…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात दहा ठिकाणी रोबोटिक बोटीचे वाटप, जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.त्या अंतर्गत केळवे,सातपाटी वाणगाव डहाणू,घोलवड,तारापूर,या सहा सागरी पोलीस ठाणी, पालघर,डहाणू जव्हार,या तीन नगरपरिषदा व एक वाडा नगरपंचायत,अशा दहा ठिकाणी बोटी दिल्या आहेत. काल केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम,सहापोलीस निरीक्षक केळवा,विजया गोस्वामी,पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी,अदिवाल आणि सर्व सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच पालघर, डहाणू,जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे.कारण…
दीपक मोहिते वसई विरार शहर मनपा ; भाजप सर्वस्व पणाला लावणार… गेल्या पाच दिवसात news27.in या वेबपोर्टलने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रमुख पक्षांची कशी भूमिका असेल,या विषयी अनेक पैलू वाचकांसमोर आणले. वास्तविक या विषयी त्यांच्या प्रमुख नेत्यांनी भरभरून बोलायला हवे होते.पण दुर्देवाने तसे घडले नाही. त्यामुळे या सर्व मुलाखतीमध्ये दोन्ही बाजू समोर येऊ शकल्या नाहीत.या पक्षाच्या नेत्यांशी आम्ही सातत्याने संपर्क करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,पण शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष वगळता एकाही नेत्यांनी तशी हिंमत दाखवली नाही.त्यामुळे त्यांच्या पक्षातील असंतुष्ट आत्म्याचा आम्हाला आधार घ्यावा लागला.या माध्यमातून पक्षाची सद्यस्थिती,निवडणुकीची तयारी,पक्षातील अंतर्गत मतभेद व निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ,इ.विषयी मतदारांना भरीव माहिती…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” युद्धानंतर पाकिस्तान कर्जाच्या खाईत सापडला आहे… पाकिस्तान किंवा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान,हा दक्षिण आशिया खंडातील एकदेश असून,हा भारताच्या वायव्य दिशेला आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे ( परगणा ) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हे सर्वात मोठे शहर असुन ते व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे २५ कोटीच्या घरात असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा जगात सहाव्या क्रमांकांचा देश आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते.बोलीभाषा,वंश, भूगोल,वन्यप्राणी यात प्रचंड विविधता येथे पाहायला मिळते.पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, उद्योगीकरण,हे अद्याप उर्जितावस्थेत आहेत.लष्करी राजवट,राजकीय अस्थिरता,शेजारी…
वसंत भोईर,वाडा पडीक जमिनीवर फायदेशीर पिकांची लागवड करा, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी,यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत असतात.यामध्ये जमिनीवर औषधी वृक्ष लागवड,फुल पिक,तसेच फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात आली आहे. फळबाग व औषधी वृक्ष लागवड या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळपिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आवर वैयक्तिक बांधावर,सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळ झाड व फुल पीक लागवड करता येते.…
अनिकेत मेहेर,डहाणू माजी आ.लहानू कोम अनंतात विलीन, शिक्षणमहर्षी,समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करणारे आणि सदैव समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे,आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे अध्यक्ष,वारली समाजरत्न,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार,माजी आमदार, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज सकाळी ५.३५ च्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.गेले १० दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खाजगी इस्पितळात आय.सी.यू.मध्ये उपचार घेत होते. कॉम्रेड लहानू कोम यांचे पार्थिव उद्या सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत कम्युनिस्ट पार्टी कार्यालय,तलासरी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी ठीक ११:०० वाजता कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा तलासरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहॆ. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे…
सुरेश काटे,तलासरी हक्काच्या जमिनीचा मोबदला नाही ; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा, मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील लाखनपाडा परिसरातील २० हून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना तीन वर्षांनंतरही अद्याप मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.याविषयी जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वडिलोपार्जित जमिनीत आंबा,चिकू,चिंच,काजू,खजुरी यांसारख्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा मोबदला न देता संबंधित ठेकेदार कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले.परिणामी अनेक शेतकरी उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन नाहीसे झाले. शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.तीन प्रांताधिकारी बदलले,परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला मोबदला…
