वसंत भोईर,वाडा
पडीक जमिनीवर फायदेशीर पिकांची लागवड करा,
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी,यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत असतात.यामध्ये जमिनीवर औषधी वृक्ष लागवड,फुल पिक,तसेच फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात आली आहे.
फळबाग व औषधी वृक्ष लागवड या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळपिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आवर वैयक्तिक बांधावर,सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळ झाड व फुल पीक लागवड करता येते. करंज,अर्जुन,आसाम बेहडा, हिरडा,बेल,रक्तचंदन,रिटा, शिवण,गुगल बिबा,आंबा आदी झाडांची लागवड करता येते.
एमआरईजीएस या योजनेत फक्त अल्पभूधारक शेतकरी सहभागी होऊ शकतात.त्यासाठी त्यांना सातबारा/ आठ अ,जॉब कार्ड, ग्रामपंचायत ठराव,आधार कार्ड,बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता असते.
आपण शेतात सहसा बांध किंवा पडीक जागेत काही लागवड करत नाही.पण शासनाच्या योजनेमुळे फळबाग किंवा औषधी वृक्ष लागवड केल्यास भविष्यात शेतकऱ्यास बऱ्यापैकी आर्थिक उपन्न मिळू शकते.
या योजनेअंतर्गत शेतामध्ये पडीक जमिनीवर किंवा बांधावर औषधी वनस्पती लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.हे अनुदान पीक निहाय वेगवेगळ्या स्वरूपात असते. यात करंज,अर्जुन,आसाम बेहडा,हिरडा बेल,रक्तचंदन, रिठा, शिवण, गुगल बिबा यांसाठी ८२ हजार १७९ रु. शिंदी – १ लाख१८२ रु.साग – १ लाख ५१ हजार ७९१ रु. बांबू – ९७ हजार ९६ रु.प्रति हेक्टर अनुदान मिळते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी हा अल्पभूधारक असणे आवश्यक आहे. उपभूधारकांमध्ये जमीन क्षेत्र मर्यादा ही अर्धा एकरापासून ते दोन हेक्टर पर्यंत असते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक बांधावर,सलग शेतावर पडीक जमिनीवर फळझाड व फुल पीक लागवड,शेतकऱ्यांना करता येते.
शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपले आर्थिक जीवनमान उंचावले पाहिजे.यासाठी शासनस्तरावरील सर्व योजना राबवून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे.
– संजय घरत, कृषी अधिकारी,

