संजय नेवे,विक्रमगड
नुकसानग्रस्त गावांना जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली भेट,
गेल्या दोन दिवसापूर्वी विक्रमगड तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे टेटवाळी – देहर्जे सवादे या भागात मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली.त्यामुळे भागात अनेक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांना भेटी दिल्या व परिस्थितीची पाहणी केली.
तसेच साखरे येथे सुरू असलेल्या देहर्जे प्रकल्पाच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली.
त्यानंतर विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व म्हसेपाडा येथील गावानाही त्यांनी भेटी दिल्या.म्हसेपाडा येथे नदी असल्यामुळे त्या गावातील लोकांना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी योग्य ती सोय नाही.त्यामुळे जिल्हाधिका ऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीची देखील पाहणी केली.
या दौऱ्यात विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एम.पाटील,गटविकास अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

