जव्हार प्रतिनिधी,
पिकाची नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी सुखावले,
शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी दीर्घ व लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.याच प्रयत्नाचा भाग म्हणून खावडाचार पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारण्याचे काम पालघर जिल्ह्यात सध्या सुरू आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल २००० मेगा वॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे.
उच्च वीजवाहक तारा व टॉवर उभारल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली पारंपारिक शेती व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहेतसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, गोवंशपालन,फळबाग,
फुलशेती असे जोडधंदे देखील हे शेतकरी करू शकतात.तसेच ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या जमीन वापराबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देखील मिळत आहे.इतकेच नव्हे तर प्रकल्पाकरता वापरलेली जमीन ही शेतकऱ्यांच्याच मालकीची राहते.असे असले तरीही सध्या टॉवर उभारणीच्या कामामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामामध्ये शेती करता येणार नाही. म्हणूनच शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीकनुकसान भरपाई देण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील पोळे,कोसबाड,म्हसरोली, कुर्झे,नळशेत येथील शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीक नुकसानभरपाई मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.पोळे येथील शेतकरी संजय मधु वावरे हे गवार तसेच कांद्याची लागवड करतात.त्यांच्या शेतात सध्या टॉवर उभारणीचे नियोजन सुरू आहे.अर्थातच चालू हंगामात त्यांना गवार तसेच कांदा ही पिके घेता येणार नसल्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्यांना पीक नुकसानभरपाई देण्यात आली आहे.हंगामापूर्वीच पीक नुकसानभरपाई मिळाल्यामुळे मी सुखावलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तसेच नळशेत येथे राहणारे व कोसबाड हद्दीमध्ये शेतजमीन असणारे नामदेव शंकर तरे,हे भाताची लागवड करत असतात.तूर्तास त्यांच्या कोसबाड येथील शेत जमिनीमध्ये टॉवर उभारणीचे काम सुरू आहे.त्यामुळे शेतीच्या नुकसानीची भरपाई हंगामापूर्वीच मिळाल्याने मी अत्यंत समाधानी असल्याची प्रतिक्रिया नामदेव तरे यांनी व्यक्त केली.

