दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
युद्धानंतर पाकिस्तान कर्जाच्या खाईत सापडला आहे…
पाकिस्तान किंवा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान,हा दक्षिण आशिया खंडातील एकदेश असून,हा भारताच्या वायव्य दिशेला आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे ( परगणा ) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हे सर्वात मोठे शहर असुन ते व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे २५ कोटीच्या घरात असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा जगात सहाव्या क्रमांकांचा देश आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते.बोलीभाषा,वंश, भूगोल,वन्यप्राणी यात प्रचंड विविधता येथे पाहायला मिळते.पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, उद्योगीकरण,हे अद्याप उर्जितावस्थेत आहेत.लष्करी राजवट,राजकीय अस्थिरता,शेजारी असलेल्या भारतासोबत कायम तणावपूर्ण संबंध राहील्यामुळे गेली साडेसात दशके पाकिस्तानी जनतेला कायम गरिबीला सामोरे जावे लागले.
पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे.पाकिस्तान हे एक स्वयंघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून घोषित झाले आहॆ. अण्वस्त्रसज्जता असलेले हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे.पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे.या देशाचे चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत.पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे ( सध्याची इस्लामिक सहयोग संघटना ) जनक राष्ट्र आहे.पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रे,राष्ट्रकुल आणि जी-२०,या संघटनांचा सदस्य आहे. सुरुवातीला भारताचाच एक भाग असलेला हा भूभाग १९४७ ला विभागला गेला. यातून भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली.एक स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची ओळख निर्माण झाली आहे.
पाकिस्तान एक विकसनशील देश मानला जातो आणि ” नेक्स्ट इलेव्हन,” या अकरा देशांच्या गटामध्ये तो सामाविष्ट आहे.जो बीआरआयसीएस ( ब्रिक्स – ब्राझील,रशिया,भारत, चायना आणि दक्षिण आफ्रिका ) सोबत २१ व्या शतकात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची स्वप्न पाहत असतो.
अलिकडच्या काळात,अनेक दशकांच्या अस्थिरतेमुळे,२०१३ मध्ये, स्थूलता आणि असंतुलित मॅक्रोइकॉनॉमिक्स मधील मूलभूत सेवा,जसे की रेल्वे वाहतूक आणि विद्युत उर्जा निर्मितीची गंभीर समस्या त्यांच्यसमोर उभी ठाकली आहे.पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अर्धउद्योगयुक्त मानले जाते.जीच्या प्रगतीचे केंद्र हे सिंधू नदीच्या काठावर असलेले प्रदेश आहेत.कराची आणि पंजाबच्या शहरी केंद्रासोबत कमी विकसित बलुचिस्तानसारखे प्रदेश या देशात आहेत.आर्थिक गुंतागुंत निर्देशांकानुसार,पाकिस्तान हा जगातील ६७ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यात करणारी अर्थव्यवस्था आहे.आणि त्यांची अर्थव्यवस्था ही १०६ व्या क्रमांकाची सर्वात जटिल अर्थव्यवस्था आहे.२०१५-१६ च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानची निर्यात २०.८१ अब्ज अमेरिकी डॉलर होती आणि आयात ४४.७६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, परिणामी २३.९६ अब्ज अमेरिकी डॉलरचा नकारात्मक व्यापार शिल्लक राहतो.
पाकिस्तान नैसर्गिक वस्तूंचे सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि त्याचे श्रमिक बाजार हे जगातील दहाव्या क्रमांकावर आहे.२०१५-१६ मध्ये अर्थव्यवस्थेत १९.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले.पाकिस्तानला पैसे पाठवणारे प्रमुख स्रोत म्हणजे संयुक्त अरब अमिरात,अमेरिका, सौदी अरेबिया,आखाती देश ( बहरीन,कुवैत,कतार, ओमान) ऑस्ट्रेलिया,कॅनडा, जपान,युनायटेड किंग्डम, नॉर्वे,आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत.वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते,संपूर्ण जगभरातील निर्यातीमध्ये पाकिस्तानचा वाटा सतत कमी होत आहे.२००७ मध्ये तो केवळ ०.१२८ % इतका होता.
जागतिक बँकेने पाकिस्तानमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध सुधारणा राबवण्यावर भर दिला आहे,जे देशातील गरिबी आणि असमानता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पाकिस्तानमध्ये ” गरिबी,” मोठ्याप्रमाणात वाढली आहॆ,हे वर्ल्ड बँकेच्या एका अहवालाने सिद्ध झाले आहॆ.
भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या भिकेला लागली आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( आयएमएफ ) आणि इतर जागतिक संस्थांकडून कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदत मिळत असूनही,पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.महागाईच्या भयंकर परिणामामुळे लोकांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानमधील ही वाढती गरिबी आपण नाही,तर जागतिक बँकेच्या नवीन अहवालाने उघड केली आहे. या अहवालात गरिबी वाढण्याचे प्रमुख कारणही दिले आहे.विशेष म्हणजे, जागतिक बँकेकडून जून महिन्यात पाकिस्तानसाठी २० अब्ज डॉलर्सची रक्कम मंजूर होण्याची चर्चा सुरू असतानाच हा अहवाल समोर आला आहे.
मदतीनंतरही पाकिस्तानची स्थिती का सुधारली नाही?गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या दुर्दशेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.आर्थिक संकटाच्या काळात,लोक पीठ, डाळींपासून ते गॅस आणि पाण्यापर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी आपला जीव धोक्यात घालताना पाहायला मिळाले.जागतिक बँकेने दया दाखवून त्यांना मोठी आर्थिक मदत दिल्यानंतरही पाकिस्तानात काहीच सुधारणा दिसत नाहीत.सामान्य लोकांचे जीवन सुधारण्याऐवजी, दहशतवादाचे आश्रयस्थान असलेला हा देश आपला पैसा दहशतवाद्यांवर आणि भारताविरुद्धच्या कारवायांवर वाया घालवत असल्याचे सर्रास आरोप होत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतच्या वाढलेल्या तणावादरम्यान हे जगभरात स्पष्ट झाले आहॆ.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाही याची गंभीर दखल घ्यावी लागलीत्यामुळे, पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त आर्थिक मदतीसह बेलआउट ( बेलआउट पॅकेज ) मंजूर झाल्यानंतर लगेचच त्यांच्यावर ११ नवीन अटी लादण्यात आल्या.ज्यामुळे पाकिस्तानवर आणखी आर्थिक दबाव वाढला.सध्या पाकिस्तानवर तब्बल १३१ अब्ज डॉलर्सचे बाह्यकर्ज आहे,जे त्याच्या एकूण जीडीपीच्या सुमारे ४२ % आहे.तर,देशातील लोक महागाई,उपासमार आणि बेरोजगारीने त्रस्त आहेत.
पाकिस्तानात गरिबी वाढण्यामागे ” जीएसटी,” हे मुख्य कारण आहॆ.जागतिक बँकेच्या ” पाकिस्तानमधील असमानता आणि गरिबीवर कर आणि हस्तांतरणाचे परिणाम,” या शीर्षकाच्या नवीन अहवालातून पाकिस्तानमधील वाढत्या गरिबीमागील एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.जागतिक संस्थेने म्हटले आहे की,सामान्य विक्री कर म्हणजेच जीएसटी पाकिस्तानमध्ये गरिबी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अहवालात दावा करण्यात आला आहे की,पाकिस्तानी कुटुंबांच्या करपूर्व खर्चाच्या ७ टक्क्यांहून अधिक वाटा फक्त जीएसटी पेमेंटचा आहे.त्यामुळे गरीब आणि असुरक्षित कुटुंबे आणखी गरीब होत आहेत.डॉन वृत्तपत्रातील एका वृत्तात जागतिक बँकेच्या संशोधनाचा उल्लेख आहे,ज्यात वैयक्तिक वित्तीय साधनांचा गरिबी किंवा असमानतेवर होणारा अतिरिक्त परिणाम स्पष्टपणे दाखवतो की पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय गरिबी वाढवण्यात सामान्य विक्री कराचा सर्वात मोठा वाटा आहे.
जागतिक बँकेने आपल्या अहवालात पाकिस्तानला या धोक्याबद्दल इशारा दिल्यानंतर,यातून बाहेर पडण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.त्यांनी पाकिस्तान सरकारला देशांतर्गत महसूल संकलन आणि सार्वजनिक खर्चात सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे.राजकोषीय समभाग सुधारण्यासाठी हे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.

