अनिकेत मेहेर,डहाणू
माजी आ.लहानू कोम अनंतात विलीन,
शिक्षणमहर्षी,समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करणारे आणि सदैव समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे,आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे अध्यक्ष,वारली समाजरत्न,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार,माजी आमदार, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज सकाळी ५.३५ च्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.गेले १० दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खाजगी इस्पितळात आय.सी.यू.मध्ये उपचार घेत होते.
कॉम्रेड लहानू कोम यांचे पार्थिव उद्या सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत कम्युनिस्ट पार्टी कार्यालय,तलासरी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी ठीक ११:०० वाजता कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा तलासरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहॆ.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्ते,महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत.

