सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्यात दहा ठिकाणी रोबोटिक बोटीचे वाटप,
जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.त्या अंतर्गत
केळवे,सातपाटी वाणगाव
डहाणू,घोलवड,तारापूर,या सहा सागरी पोलीस ठाणी,
पालघर,डहाणू जव्हार,या तीन नगरपरिषदा व एक
वाडा नगरपंचायत,अशा दहा ठिकाणी बोटी दिल्या आहेत.
काल केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम,सहापोलीस निरीक्षक केळवा,विजया गोस्वामी,पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी,अदिवाल आणि सर्व सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच पालघर, डहाणू,जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे.कारण सध्या बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवत असतो.पण आता माणसाऐवजी ही रोबोटीक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा प्राण वाचवणार आहे.या बोटीची दोनशे कि.ग्रा.इतके वजन उचलण्याची क्षमता आहे.

