- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
राजू पडबिद्री बेळगाव, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटले ; नेत्यांना राज्यात प्रवेशबंदी कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.वादाची ठिणगी आता नव्याने पडली आहे.कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे.त्यास विरोध करण्यासाठी याच बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरू झाली.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते कर्नाटक पोलिसांच्या रडारवर…
दीपक मोहिते, भयाण वास्तव,भाग क्र.५ जिल्हानिर्मितीनंतर आदिवासी जमिनी वेगाने लुटण्यात येत आहेत, मुंबईलगत असलेला पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्ह्यात होता,२०१४ साली या जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला.या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आला.पण सरकारचा हा निर्णय आदिवासी समाजाला कितपत फायदेशीर ठरला,हा एक वेगळा विषय आहे. आदिवासी समाजाला केंद्रबिंदू ठेवून सरकारने दहा वर्षापूर्वी जिल्ह्याची ” दिशा व दशा,” निश्चित केली.त्यानुसार जिल्ह्याचा कारभारही सुरू झाला.सुरुवातीचा काळ स्थिरस्थावर होण्यात गेला.जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे करण्यात आल्यामुळे जव्हार,मोखाडा व विक्रमगडवासियांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते,कालांतराने ते निवळले.जिल्हा निर्मितीमुळे आदिवासी लोकांच्या जीवनात काही बदल झाला का ? त्यांचे…
दीपक मोहिते, ईव्हीएम मशीन ; सरकार घाबरतयं का ? आज ना उद्या अंध:कार दूर होणार.. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल संशयास्पद असल्याचे उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे म्हणणे आहे,त्याची शहानिशा व्हावी,यासाठी राजकीय पक्ष विविध सामाजिक संस्था सध्या आक्रमक झाल्या आहेत.त्यांच्या या मागणीची दखल केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय घ्यायला तयार नाहीत.सदर बाब भारतीय संविधानातील कलम ५० चे उल्लंघन आहे.या कलमानुसार न्याययंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून अलिप्त असली पाहिजे.पण गेल्या दहा वर्षात केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय हे दोघे एकाही प्रकरणी अलिप्त नसल्याचे दिसून आले आहे.तर कलम ५१ क नुसार संविधानाचे पालन करणे,हे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते.पण सरकार गेल्या दहा…
नादुरुस्त व कालबाह्य एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण,खा.डॉ.सवरा यांनी लक्ष घालावे, जव्हार ( प्रतिनिधी ) जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांतील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय असलेल्या जव्हार एसटी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली आहे.या बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सतत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विस्कळीत बससेवा,वेळेत येजा न करणाऱ्या बसेस, प्रवासादरम्यान बसेस नादुरुस्त होणे,अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्तआहेत. जव्हार एसटी आगारातून दररोज प्रवाशांसाठी ५३ फेऱ्या चालवण्यात येतात.यामध्ये ३८ बसेस प्रवासी वाहतुकीसाठी तर १८ बसेस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत.मात्र,जवळपास ५६ बसेसपैकी ५० बसेस जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसच्या तुटलेल्या खिडक्या,गळकी छते, तुटलेल्या खुर्च्या अशा समस्यांमुळे प्रवासी नाराज आहेत.पावसाळ्यात गळणाऱ्या…
संजय लांडगे,वाडा शहर, विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षेसोबत इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे-खा. डॉ.सावरा, शालेय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व आपल्या परिवाराचे तसेच देशाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन खा.डॉ. हेमंत सावरा यांनी विद्यार्थ्यांना केले.वाडा शहरातील नुरबाग हॉल येथे आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धा परीक्षेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. क्रांतिज्योत बहुउदेशीय सामाजिक संघटना व आय. टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,आयोजित थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय व्हावी,ग्रामीण,दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी – युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी,या उद्देशाने स्पर्धांचे…
दीपक मोहिते, हवामानातील बदलामुळे कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण, राज्यात गेल्या पाच दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राला जबर फटका बसला आहे.गहू तुर,कांदा,हळद सोयाबीन द्राक्ष व अन्य कृषी उत्पन्नावर विविध रोगाचे आक्रमण झाले आहे.मात्र या ज्वलंत समस्येबाबत राज्याचे कृषी विभाग मात्र उदासीन आहे.विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी केली आहे. वातावरणात झालेला बदल,हा शेतकऱ्यांना मारक ठरला असून अनेक पिकांवर रोग पडला आहे.यवतमाळ जिल्ह्यात हळदी पिकावर करपा रोग पडला असून या जिल्ह्यात हजारो हे.जमिनीवर हळदीची लागवड करण्यात येत असते.या रोगाच्या आक्रमणाने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत.कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती…
दीपक मोहिते, १२ वी मॅरेथॉन स्पर्धा ; कालिदास हिरवे,रोहित वर्मा व सानिका अंतिम विजेते, थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत १२ व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चभ्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये ५८ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली. २ तास १८ मिनिटे आणि १९ सेकंदांच्या वेळेसह, साताऱ्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला,परंतु त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली.हिरवे यांच्या पाच सेकंदमागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला.दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोडने २…
दीपक मोहिते, अभ्यास दौरा, वसई विकासिनी दृककला विद्यार्थ्यांची चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट, वसईमधील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आज चित्रकला साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट घेऊन चित्रकलेच्या साहित्य निर्मितीची माहिती घेतली.ही भेट म्हणजे एकप्रकारचा अभ्यास दौराच होता. चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देणारे वसई विकासिनी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्रे काढून चित्रकलेचा मनमुराद आनंद लुटला. वसईतील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे ५३ विद्यार्थी,६ शिक्षक,वसई विकासिनी संस्थेचे विश्व्स्त सचिव जयंत देसले आणि कार्यकारीणी सचिव विजय वर्तक यांनी उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक संतोष रवेशीया त्यांचे चिरंजीव ओम…
दीपक मोहिते, ३५ व्या वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी, वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची बैठक नुकतीच क्रीडा मंडळ येथे पार पडली. महोत्सवाचे यंदाचे ३५ वे वर्ष असून हा महोत्सव शानदार सोहोळ्यात पार पडावा,यासाठी महोत्सवाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत आहेत.या सोहोळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वसई,नालासोपारा,विरार, प्रवेशअर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १० डिसें.आहे.मात्र,शाळेतील क्रीडाशिक्षक यांना यावर्षी अतिरिक्त शासकीय कामे असल्या कारणामुळे सदर मुदत चार दिवस वाढवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता क्रीडा मंडळ वसई येथे अर्ज स्विकारण्याची तारीख ही १४ डिसें.संध्या.सात वाजेपर्यंत करण्यात…
संजय नेवे विक्रमगड, पिकअप जीप व मोटार सायकलच्या अपघातात दोन तरुण ठार, आज सकाळी विक्रमगड-पाली रस्त्यावरील देवमोगरा पेट्रोल पंपानजिक पिकअप जीप व मोटारसायकल यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणाचा मृत्यू झाला. विक्रमगड येथील दोन तरुण वाडा येथून आपल्या मुळगावी जात असताना त्यांनी पिकअप जीपला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मयत झालेले संदेश लहानु पागी – २५, विजय भंडारी – २४,हे दोघे अनुक्रमे थरोंडा व सारशी येथील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर पिकअप जीप मधील मजुरांनी या दोघांना तातडीने विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या दुर्घटनेत विजय भंडारी मयत झाला होता.तर संदेश पागी यांच्यावर प्रथमोपचार करून त्याला जव्हार येथे पुढील उपचारासाठी…
