दीपक मोहिते,
अभ्यास दौरा,
वसई विकासिनी दृककला विद्यार्थ्यांची चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट,
वसईमधील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आज चित्रकला साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट घेऊन चित्रकलेच्या साहित्य निर्मितीची माहिती घेतली.ही भेट म्हणजे एकप्रकारचा अभ्यास दौराच होता.
चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देणारे वसई विकासिनी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्रे काढून चित्रकलेचा मनमुराद आनंद लुटला.
वसईतील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे ५३ विद्यार्थी,६ शिक्षक,वसई विकासिनी संस्थेचे विश्व्स्त सचिव जयंत देसले आणि कार्यकारीणी सचिव विजय वर्तक यांनी उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक संतोष रवेशीया त्यांचे चिरंजीव ओम व त्यांच्या मुलीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला व कंपनीत तयार होणाऱ्या साहित्याची माहिती दिली.सदर कंपनी सुमारे ४० एकरमध्ये पसरली असून या कंपनीमध्ये ६ हजार कामगार काम करत आहेत.येथे पेंटिंगच्या साध्या ब्रशपासून ते कॅनव्हासपर्यंत सर्व साहित्याचे उत्पादन करण्यात येत असते.ही भेट म्हणजे एक अभ्यास दौराच होता.ज्या क्षेत्रात आपण करियर करत आहोत,त्यासाठी लागणारे साहित्य कुठे तयार करण्यात येते,त्यासाठी लागणारे इतर साहित्य याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी,असा उद्देश या अभ्यास दौऱ्यामागे होता.विद्यार्थ्यानी या दौऱ्याविषयी समाधान व्यक्त केले असून,असे अभ्यास दौरे होणे,आवश्यक आहेत,अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

