संजय नेवे विक्रमगड,
पिकअप जीप व मोटार सायकलच्या अपघातात दोन तरुण ठार,
आज सकाळी विक्रमगड-पाली रस्त्यावरील देवमोगरा पेट्रोल पंपानजिक पिकअप जीप व मोटारसायकल यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणाचा मृत्यू झाला.
विक्रमगड येथील दोन तरुण वाडा येथून आपल्या मुळगावी जात असताना
त्यांनी पिकअप जीपला जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत मयत झालेले
संदेश लहानु पागी – २५,
विजय भंडारी – २४,हे दोघे अनुक्रमे
थरोंडा व सारशी येथील रहिवाशी आहेत.
या घटनेनंतर पिकअप जीप मधील मजुरांनी या दोघांना तातडीने विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या दुर्घटनेत विजय भंडारी मयत झाला होता.तर संदेश पागी यांच्यावर प्रथमोपचार करून त्याला जव्हार येथे पुढील उपचारासाठी पाठवले असता,डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषीत केले.विक्रमगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पिकअप जीप चालकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

