दीपक मोहिते,
३५ व्या वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी,
वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची बैठक नुकतीच क्रीडा मंडळ येथे पार पडली. महोत्सवाचे यंदाचे ३५ वे वर्ष असून हा महोत्सव शानदार सोहोळ्यात पार पडावा,यासाठी महोत्सवाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत आहेत.या सोहोळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वसई,नालासोपारा,विरार, प्रवेशअर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १० डिसें.आहे.मात्र,शाळेतील क्रीडाशिक्षक यांना यावर्षी अतिरिक्त शासकीय कामे असल्या कारणामुळे सदर मुदत चार दिवस वाढवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता क्रीडा मंडळ वसई येथे अर्ज स्विकारण्याची तारीख ही १४ डिसें.संध्या.सात वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तालुक्यातील स्पर्धक प्रवेशापासून वंचित राहू नये व त्यांच्या कलागुणांना वाव मिळवा,यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महोत्सवाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी व्यक्त केली. यावर्षी नवीन स्पर्धेमध्ये स्कॅश ही स्पर्धा दत्तानी क्लब येथे होणार आहे.तर दहीहंडी ही स्पर्धा १६ संघामध्ये होणार आहे. स्वसंरक्षणार्थ लाठीकाठी व जुडो,इ.स्पर्धाचा समावेश आहे.या बैठकीला केवल वर्तक,अनिल वाझ,माणिकराव दुतोंडे,मकरंद सावे,राजेश जोशी,विलास पगार,,माजी नगरसेविका ज्योती धोंडेकर आणि नीतिशा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

