सुरेश काटे, तलासरी,
तलासरीत मिनी मॅरेथॉन २०२५,स्पर्धेचे आयोजन,
दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी आदिवासी प्रगती मंडळ तलासरी,आयोजित कॉ.शामराव परुळेकर स्मृती प्रित्यर्थ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते.या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे.
या स्पर्धेत संस्थेच्या सर्व शाखांमधून एकूण ३४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मिनी मॅरेथॉन प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात अशा ४ गटात घेण्यात आली. मॅरेथॉनचे उद्घाटन आ.विनोद निकोले,नगराध्यक्ष सुरेश भोये व रावजी कुऱ्हाडा यांच्या हस्ते कॉ.शामराव परुळेकर,कॉ. गोदावरी परुळेकर व स्व.कॉ.लहानू कोम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना आ.विनोद निकोले यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.ए. राजपूत,संदीप वावरे व सर्व शाखाप्रमुख,क्रीडाशिक्षक,प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेची सुरवात आ.विनोद निकोले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व झेंडा दाखवून करण्यात आली.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षक,रक्षक म्हणून मोलाचे योगदान दिले.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

