राजू पडबिद्री बेळगाव,
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटले ; नेत्यांना राज्यात प्रवेशबंदी
कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.वादाची ठिणगी आता नव्याने पडली आहे.कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसें.पासून सुरु होत आहे.त्यास विरोध करण्यासाठी याच बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळपासून बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरू झाली.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते कर्नाटक पोलिसांच्या रडारवर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर यांचा पोलिसांकडून पाठलाग करण्यात आल्यामुळे शहरातील मराठी भाषिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.ते व्यायाम करण्या घराबाहेर पडले असता,त्यांचा पोलिसाकडून पाठलाग सुरू झाला.दरम्यान
बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरे शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने बेळगावकडे निघाले आहेत.त्यामुळे कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली.तसेच त्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात असताना कर्नाटक पोलिसांनी या नेत्यांना रोखलं.यावेळी ” आम्हाला अभिवादन करत हार अर्पण करण्यासाठी जाऊ द्या,” अशी विनंती या नेत्यांनी केली असता,ती नाकारण्यात आली व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

