- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा १९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले, तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनिल गवारी वय ३६ या आहेत.येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच सरपंच शोभा गवारी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी…
सचिन परब,विरार लायन्स क्लबतर्फे आगाशी जिल्हा परिषद शाळेला बेंचेसची भेट, राज्यातील जिल्हा परीषद शाळांची दुर्दशा व दिवसेंदिवस कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था नेहमीच खारीचा वाटा उचलत असतात. विरारमधील एका शाळेला लायन्स क्लबकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.या मदतीमुळे विद्यार्थ्याँना दिलासा मिळाला आहे. वसई तालुक्यातील आगाशी येथील जिल्हा परिषद शाळा ही एकेकाळी नावाजलेली अशी शाळा.बदलत्या काळात इंग्रजीच्या ओढ्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली.तसेच शासनाच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळेची पार दुरावस्था झाली आहे. शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सध्या अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते.या शाळेत…
वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा, जागतिक हिवताप दिना निमित्त आरोग्य विभागाकडून तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानीवली,प्रा.आ.केंद्र गोऱ्हे, प्रा.आ.केंद्र परळी,प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी जागतिक हिवताप दिन ” चला हिवताप संपवू या : पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा.आ.केंद्र खानिवली अंतर्गत येणाऱ्या मौजे तुसे येथे वैद्यकीय अधिकारी अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तुसे गावात हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमिक विद्यामंदिर तुसे येथील विध्यार्थ्यांना हिवताप,डेंगू,चिकन गुनिया, हत्ती…
जव्हार प्रतिनिधी, जिजाऊ रथयात्रेचे जव्हार नगरीत भव्य स्वागत, “ बहुजन मराठा जोडो अभियान,” अंतर्गत महाराष्ट्रभर प्रवास करणारी जिजाऊ रथयात्रा काल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या जव्हार नगरीत दाखल झाली.विविध परंपरा,ऐक्य आणि बहुजनांच्या संघर्षांचा वारसा मांडणारी,ही यात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादाने संस्मरणीय ठरली. यात्रेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर यात्रेने आदिवासी क्रांतिकारक चौक गाठले,जेथे पारंपरिक तारपा नृत्य पथक साखरशेत यांनी सादर करून आदिवासी समाजाच्या थोर क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.सांस्कृतिक परंपरेच्या अभिव्यक्तीचा हा भाग उपस्थितांमध्ये भारावणारा ठरला.त्यानंतर सहविचार सभा व ” बहुजन समाज…
संजय नेवे,विक्रमगड बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा, खा.डॉ.हेमंत सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदार संघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीत तीन विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली. बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे. ४ मार्च २०२५ रोजी समुद्रात झालेल्या अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात बुडाले होते.यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीनजण अद्याप बेपत्ता आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट ओढवले आहे.तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे, अशी मागणी खा. सवरा केली…
शुभम सावंत, विरार पाकिस्तानचा झेंडा फाडुन व जोडे मारून विरार शिवसेनेने केला निषेध, जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरार शहरातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन उभारून पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अजहर खान, शहर संघटक शिला लष्करे, शहर समन्वयक प्रदिप साने, कार्यालयप्रमुख सुनील चव्हाण,उपसचिव प्रसाद मिर्लेकर, उपशहरप्रमुख शशी कदम,जितेंद्र खाडे,उपशहर संघटक रोशनी जाधव, उपशहर अधिकारी रोहित कदम,विभागप्रमुख गणेश धावडे,सुशांत घाग,यश चोरघे, महेश लांजवळ,अजय पिंपळे, आदि शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीम शेख,पालघर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये मुस्लिम समाजाकडून जोरदार निषेध, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पालघर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दु.२.०० वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पालघरमध्येही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळी फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.या दरम्यान ” पाकिस्तान मुर्दाबाद,” व पाकिस्तानवर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील चौदा गावपाड्याना टॅकरने पाणीपुरवठा, तालुक्यातील चौदा गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे लाखो करोडो रू.खर्च करून बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.या योजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ,टोकरेपाडा, जांभूळपाडा,घोडसाखरे, दिवेपाडा,फणसपाडा, गवळीपाडा,तरसेपाडा तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा,फणसपाडा पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास,मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यामुळे या गावांना टॅकरने पाणी पुरवठा सुरू केला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून या योजनांचा…
वसंत भोईर,वाडा कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे कच-याने तुडुंब भरलेली, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे प्लास्टिक व विविध कच-याने भरल्या असून त्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी,अन्यथा पावसाळ्यात कुडूसमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कुडूस ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घेऊन नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा. कुडूस ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.तसेच ती आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहे,परंतु या ग्रामपंचायतीकडून सफाईची कामे प्रभावीपणे करण्यात येत नाहीत.येथे मोठी बाजारपेठ असून शुक्रवारी येथे आठवडा बाजार भरतो.या बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी येतात असतात.हे व्यापारी माल विक्री करून झाल्यावर उरलेला कचरा असाच अस्ताव्यस्त टाकत असतात. तसेच येथील व्यापारीही आपल्या दुकानातील कचरा गटार परिसरात टाकत असतात.त्यामुळे हा…
दीपक मोहिते, सीमेवर पाकचा गोळीबार ; भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या सैन्याने सीमेवर असलेल्या आपल्या चौक्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.भारताने पाकिस्तानवर कठोर निर्णय लादल्यानंतर पाकिस्तानने देखील ताठर भूमिका स्विकारली आहे.त्यांनीही आपल्यावर निर्बंध लादले असुन सीमावर्ती भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहेत.जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला,परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही,असे सूत्रांनी सांगितले.…
